कोरोना रुग्ण आढळल्याची व्हायरल पोस्ट खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:04 IST2020-03-17T12:04:16+5:302020-03-17T12:04:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : एका न्यूज चॅनेलचा लोगो घेवून त्यात अक्कलकुव्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले अशी पोस्ट व्हायरल ...

Viral Post False Corona Patient Detected | कोरोना रुग्ण आढळल्याची व्हायरल पोस्ट खोटी

कोरोना रुग्ण आढळल्याची व्हायरल पोस्ट खोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : एका न्यूज चॅनेलचा लोगो घेवून त्यात अक्कलकुव्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ती पोस्ट खोटी असून संबधीतांचा शोध घेतला जावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रभारी तहसीलदार विजय कचवे यांनी माहिती दिली.
अक्कलकुवा शहरात कोरोना साथीबाबत सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरवली जात असून व्हायरल करण्यात आलेल्या फोटोमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोना या साथीबाबत अक्कलकुवा शहरासह तालुक्यामध्ये संपूर्णत: खबरदारी घेतली जात असून प्रशासन त्याबाबत सतर्क असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार विजय कचवे यांनी दिली. सामाजिक माध्यमांमध्ये कोरोना आजाराविषयी अफवा पसरविणाऱ्यांवर तात्काळ कारवाई कारवाई केली जाईल सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये अक्कलकुवा शहरात अफवा पसरवणाºया अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्या शोध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणीही बेजबाबदारपणे याबाबत वक्तव्य केल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी यावेळी कोरोना या साथी च्या आजारा विषयी कोणीही अफवा पसरवू नये तसेच या आजाराबाबत जागृत राहून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे स्वत:हून आपण त्याबाबत अधिक काळजी घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वानखेडे यांनी यावेळी करून कोणीही अफवा पसरवू नये असेही सांगितले. गट विकास अधिकारी सी.के .माळी ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल मालखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Viral Post False Corona Patient Detected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.