नंदुरबारात महिला पोलिसाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:49 IST2020-06-08T11:49:21+5:302020-06-08T11:49:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन महिलांना दुचाकीवर जातांना अडवून कारवाई केल्याचा राग आल्याने एकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिविगाळ ...

नंदुरबारात महिला पोलिसाचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन महिलांना दुचाकीवर जातांना अडवून कारवाई केल्याचा राग आल्याने एकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यास शिविगाळ करून विनयभंग केल्याची फिर्याद महिला पोलिसाने केली आहे.
शहरातील धुळे चौफुलीवर वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी दोन महिला एका दुचाकीने जात असतांना त्यांना महिला पोलीस कर्मचाºयांनी अडविले. त्यांनी दंडात्मक कारवाईचे २०० रुपयांची पावती फाडण्याचे सांगितले. त्यावेळी महिलेसोबतच्या मुलीने तिच्या वडिलांना फोन करून कारवाई संदर्भात सांगितले.
मुलीचे वडिल रवींद्र जाधव त्या ठिकाणी आले असता त्यांनी जाब विचारत महिला पोलीस कर्मचाºयाशी वाद घातला व शिविगाळ केली, अरेरावी केली तसेच शासकीय कामात अडथळा आणला. शिवाय तोंडाला मास्क न लावता प्रतिबंधीत आदेशाच उल्लंघन केले.
याबाबत महिला पोलीस कर्मचारीने नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने रवींद्र जाधव, रा.हरिभाऊनगर यांच्याविरुद्ध शिविगाळ, विनयभंग आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या लॉकडाऊनच्या आदेशात दुचाकीवर डबल सीट बसविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतांनाही त्या आदेशाचे उल्लंघन शहरात सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे कारवाईचे सत्र सुरू आहे.