करणखेडय़ात ‘कंस’ने केला महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:07 IST2019-08-19T12:07:33+5:302019-08-19T12:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील करणखेडा येथे एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी ...

करणखेडय़ात ‘कंस’ने केला महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील करणखेडा येथे एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना 31 जानेवारी रोजी घडली होती़ याप्रकरणी शनिवारी संशयिताविरोधात न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा दाखल करण्यात आला़
कंस रुपल्या नाईक असे संशयिताचे नाव असून त्याने 31 जानेवारी रोजी महिला घरी जात असताना तिचा पाठलाग करत विनयभंग केला होता़ पिडीत महिलेने पतीला घटनेची माहिती दिली होती़ पिडितेच्या पतीने कंस यास जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली होती़ याप्रकरणी पिडितेच्या पतीने न्यायालयात तक्रार दिली होती़ अर्जावर कारवाई करत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार संशयित कंस नाईक याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक उदेसिंग वळवी करत आहेत़