विवाहाच्या अमिष देत युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:38 IST2020-02-07T12:37:56+5:302020-02-07T12:38:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : विवाहाचे अमिष देत युवतीवर वेळावेळी अत्याचार केल्याची घटना नवापुरात बुधवारी उघडकीस आली़ पिडित युवतीने ...

Violence against a woman giving a marriage mate | विवाहाच्या अमिष देत युवतीवर अत्याचार

विवाहाच्या अमिष देत युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : विवाहाचे अमिष देत युवतीवर वेळावेळी अत्याचार केल्याची घटना नवापुरात बुधवारी उघडकीस आली़ पिडित युवतीने पोलीसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला होता़
नवापुर येथील युवतीला सिद्धार्थ चित्ते ऊर्फ सिद्धू (पूर्ण नाव माहिती नाही) याने १ जानेवारी २०१९ रोजी विवाहाचे अमिष देत अत्याचार केला होता़ यानंतर सिद्धार्थ हा युवतीला वेळावेळी धमकावून सोबत नेत होता़ जानेवारी २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याने युवतीला जीजे ०५ आरएफ ९४४४ या वाहनातून गुजरात राज्यातील शबरीधाम व नवापुर रेल्वेस्थानक परिसरात नेऊन अत्याचार केला होता़ दरम्यान सिद्धार्थ चित्ते हा विवाहित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिडित युवतीने नवापुर पोलीसात धाव घेतली होती़ याबाबत पिडिताने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सिद्धार्थ विरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़

Web Title: Violence against a woman giving a marriage mate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.