नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:32+5:302021-04-09T04:32:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर आस्थापना सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहा दुकाने १५ एप्रिलपर्यंत सील ...

नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जीवनावश्यक वस्तू वगळता इतर आस्थापना सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहा दुकाने १५ एप्रिलपर्यंत सील करण्यात आली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या दुकानांमध्ये जनरल स्टोअर्स, बुक डेपो, हार्डवेअर, प्लास्टिक, पान मसाला विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. मंगळ बाजार, शास्त्री मार्केट, नेहरू पुतळा परिसर आणि नगरपालिका परिसरातही कारवाई करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आणि नंदुरबार पोलीस निरीक्षक सोनवणे उपस्थित होते.
बाजारात विना मास्क फिरणारे आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून दंड देखील वसूल करण्यात आला. यापुढे जीवनावश्यक वस्तू शिवाय इतर वस्तूंची विक्री करणारी दुकाने उघडल्यास ती अनिश्चित काळासाठी सील करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
किराणा खरेदीसाठी नागरिकांनी घरपोच सुविधा देणाऱ्या विक्रेत्यांकडून खरेदी करावी किंवा नजीकच्या किराणा दुकानातून खरेदी करावी. शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि गुरुवार ते रविवार या जनता कर्फ्यूची काटेकोर अंमलबजावणी करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.