कंटेनमेंट झोनमध्ये आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:12 IST2020-06-21T12:12:06+5:302020-06-21T12:12:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कंटेनमेंट झोनमधील नागरिक सक्त मनाई आदेश असतांनाही आदेशाचे पालन न करता सर्रास बाहेर फिरत ...

Violation of order in the containment zone | कंटेनमेंट झोनमध्ये आदेशाचे उल्लंघन

कंटेनमेंट झोनमध्ये आदेशाचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कंटेनमेंट झोनमधील नागरिक सक्त मनाई आदेश असतांनाही आदेशाचे पालन न करता सर्रास बाहेर फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढे अशी व्यक्ती फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात दोन ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर हे परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते परिसर सील करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर न पडण्याचे सक्त मनाई आदेश आहेत, असे असतांना शासनाच्या आदेशाचे भंग करून ते सर्रास बाहेर फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा नागरिकांवर यापुढे शासनाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याच बरोबर पुणे, मुंबई, सुरत, मालेगाव, सौराष्टÑ अशा भागातून येणाºया व्यक्तींची नोंद आमलाड विलगीकरण कक्षात केली जाते. शिवाय आरोग्य तपासणीही केली जात असते. कोणतीही लक्षणे आढळून न येणाऱ्यांवर शिक्का मारून घरीच राहण्याची सूचना दिली असते. परंतु असे व्यक्तीही बाजार पेठेत विविध कार्यक्रमात हजेरी लावत असल्याच्या तक्रारी आहेत, अशा व्यक्तींवरही यापुढे कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, तळोदा शहरात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण नव्हते. परंतु गेल्या १५ दिवसात अचानक रूग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु भिती असली तरी बहुतांश नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.

शासनाच्या आमलाड विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या रूग्णांपैकी काही रूग्णांनी तेथे नियुक्तीवर असलेल्या आरोग्य कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचा प्रकार केला होता. या शिवाय कर्मचाºयांशी झटापटही केल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: आता जे सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या पैकी काहींनी हा प्रकार केल्याचे पत्रात नमूद केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापुढे कोणी असे गैरवर्तन करताना आढळले तर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Web Title: Violation of order in the containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.