संचार बंदीचे उल्लंघन केल्याने दोघांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:43 IST2020-03-25T13:30:24+5:302020-03-25T13:43:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून वाहने फिरवणाऱ्या ४५ जणांवर पोलीसांनी कारवाई करत १२ हजार ...

संचार बंदीचे उल्लंघन केल्याने दोघांवर गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरात संचारबंदीचे उल्लंघन करून वाहने फिरवणाऱ्या ४५ जणांवर पोलीसांनी कारवाई करत १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला़ दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करुन दुकाने सुरु ठेवणाºया दोन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत़
मंगळवारी सकाळीपासून तळोदा शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. शहराबाहेर फिरणाऱ्यांबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली होती़ याचदरम्यान शहरात संचारबंदी असताना विनाकारण वाहने फिरवून नियमांचे उल्लंघन करणाºया ४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ त्यांच्याकडून दुपारी चार वाजेपर्यंत दंड वसूल करण्यात आला़ कारवाईदरम्यान अनेकांना पोलिसांच्या फटाक्यांना देखिल सामोरे जावे लागले आहे.
संचारबंदी सुरु असताना ओमप्रकाश सोनराज जैन यांनी त्यांच्या मालकीचे दुकान तसेच इंद्रसिंग कैलास पाडवी रा़ टेंभरी हाटी याने चहा विक्रीची टपरी सुरु ठेवल्याने पोलीसांनी कारवाई करत तळोदा पोलीस ठाण्यात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दोघांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल आनंद पाटील यांनी फिर्याद दिली होती़ तळोदा शहरात दिवसभर पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ तळोदा शहराला लागून असलेल्या गुजरात हद्दीवरील तपासणीसह शहरी भागात तपासणी करण्यात आली़