मलगाव ते सटीपाणी रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ करणार उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:45+5:302021-08-26T04:32:45+5:30
निवेदनात, शहादा तालुक्यातील मलगाव ते सटीपानी हा सात किलोमीटर रस्ता धुळे व नंदुरबार जिल्हा जोडणारा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता आहे. ...

मलगाव ते सटीपाणी रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ करणार उपोषण
निवेदनात, शहादा तालुक्यातील मलगाव ते सटीपानी हा सात किलोमीटर रस्ता धुळे व नंदुरबार जिल्हा जोडणारा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता आहे. या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत साडेचार कोटी रुपये खर्चाच्या कामास मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू झाले होते. मात्र, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याचे काम तब्बल चार वर्षे होऊनही अपूर्णावस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. रस्ता काम अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, जिल्हा परिषद सदस्य सुभाष पटले यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय प्रमुखांसह मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले आहे.