विरपूरला किरकोळ कारणातून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:26 IST2019-06-19T21:26:27+5:302019-06-19T21:26:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरपूर ता़ अक्कलकुवा येथे मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशय धरुन महिला व तिच्या ...

विरपूरला किरकोळ कारणातून महिलेस मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विरपूर ता़ अक्कलकुवा येथे मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशय धरुन महिला व तिच्या पतीस मारहाण झाली़ मंगळवारी रात्री आठ वाजता हा प्रकार घडला़
विरपूर येथील युवती गावातील युवकासोबत पळून गेली़ तिला रंजना गणेश तडवी यांनी पळवल्याचा संशय धरत भिकाराम जयसिंग तडवी आणि राजेश दयाराम तडवी या दोघांनी लाकडी डेंगा:याने मारहाण केली़ महिलेचा बचाव करण्यासाठी आलेल्या पतीलाही शिवीगाळ करुन दोघांनी मारहाण केली़ यात महिलेच्या कपाळावर डेंगारा लागून ती जखमी झाली़
याबाबत रंजना तडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भिकाराम व राजेश तडवी यांच्यावरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल राम वळवी करत आहेत़