शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
7
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
8
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
9
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
10
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
11
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
12
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
13
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
14
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
15
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
16
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
17
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
18
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
19
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
20
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारचे ग्रामदैवत मोठा मारूती देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराचे ग्राममदैवत असलेल्या मोठा मारोती मंदिराची निर्मिती साधारण 1858 साली करण्यात आल्याचा दाखला आह़े तत्पूर्वी याठिकाणी पंचगव्यापासून निर्माण करण्यात आलेली मूर्ती चौथ:यावर असल्याची माहिती आह़े कालांतराने ही मूर्ती दुभंगल्याने पूर्ण पाषाणात नवीन मूर्ती घडवून मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला होता़ नंदनगरीतील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या मोठा मारूती देवस्थानात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराचे ग्राममदैवत असलेल्या मोठा मारोती मंदिराची निर्मिती साधारण 1858 साली करण्यात आल्याचा दाखला आह़े तत्पूर्वी याठिकाणी पंचगव्यापासून निर्माण करण्यात आलेली मूर्ती चौथ:यावर असल्याची माहिती आह़े कालांतराने ही मूर्ती दुभंगल्याने पूर्ण पाषाणात नवीन मूर्ती घडवून मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला होता़ नंदनगरीतील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या मोठा मारूती देवस्थानात  भाविकांची कायम उपस्थिती असत़े  मनोरथ पूर्ण करणारा हनुमान अशी ख्याती असलेल्या मोठा मारूती मंदिराची निर्मिती तत्कालीन मंहतांनी केली होती़ याठिकाणी राधाकृष्ण, रामसिता, विठ्ठल-रूख्माई, गणपती, संत दगा महाराज यासह मोठा मारूतीची 11 फूट उंचीची मूर्ती आह़े दक्षिण मुखी असलेल्या या मारूतीची उपासना करण्यासाठी पहाटेपासून भाविक मंदिरात येतात़ नंदुरबार शहरातील प्रसिद्ध उद्योगपती गोवर्धन रघुवंशी यांनी जयपूर येथून कारागिर बोलावून घेत 11 फूटाची मूर्ती घडून घेतली होती़ या मूर्तीचा 50 वर्षापूर्वी पारंपरिक पद्धतीने जीर्णोध्दार करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी विलास जोशी यांनी दिली़ मंगळवार आणि शनिवारी याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळत़े  हनुमान जयंतीनिमित्त मंदिराच्या विश्वस्त मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यात पहाटे पाच वाजता हनुमान चालिसा पठण होणार आहे तर, सकाळी सहा वाजून 5 मिनीटांनी महाबली हनुमानची महाआरती व साडे अकरा वाजता भाविकांसाठी महाप्रसाद वाटप होणार आह़े शुक्रवारी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध मंदिराची साफ  -सफाई करून रंगरंगोटी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून आल़े ग्रामदैवत मोठा मारूती मंदिराचा सहा वर्षापूर्वी लोकवर्गणी गोळा करून जिर्णोधार करण्यात आला आहे. मंदिरात सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा माफक दरात विविध समारंभासाठी मंदिराच्या खालच्या बाजूला सभागृहाचे निर्माण करण्यात आले आहे. शहरात सर्वात जुन्या हनुमान मंदिरापैकी मोठा मारूती मंदिर आह़े या मंदिराचा सांभाळ करण्यासाठी पूर्वी संन्यस्त असलेल्या व्यक्तीची निवड केली जात होती़ ब्रrाचारी असलेल्या या व्यक्तीला या मंदिराची पूर्ण जबाबदारी देण्यात येत होती़ परंपरेनुसार देण्यात येणारी ही गादी आता विलास जोशी महाराज सांभाळत आहेत़ संन्यस्त व्यक्तीला देण्यात येणा:या जबाबदारीची परंपरा सहा वर्षापूर्वी मोडीत काढत जोशी यांना ही गादी सोपवण्यात आली आह़े मंदिरात हनुमान जयंतीसह विविध सण साजरा करण्याची मोठी परंपरा आह़े