गावाचे नाव खरवड अन ग्रामस्थांची पाण्यासाठी परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:09 IST2019-01-14T11:08:53+5:302019-01-14T11:09:06+5:30
बोरद : पूर्वीच्या काळी गावशिवारात लावलेल्या वडाच्या झाडांमुळे जमिनीची होणारी धूप थांबून भूजल पातळी स्थिर राहण्यास मदत मिळत होती़ ...

गावाचे नाव खरवड अन ग्रामस्थांची पाण्यासाठी परवड
बोरद : पूर्वीच्या काळी गावशिवारात लावलेल्या वडाच्या झाडांमुळे जमिनीची होणारी धूप थांबून भूजल पातळी स्थिर राहण्यास मदत मिळत होती़ यातून गाव तेथे वड ही संकल्पना होती़ तळोदा तालुक्यातील खरवड हे गावही या संकल्पनेत असले तरी इतर गावांपेक्षा अधिक वडाची झाडे म्हणून त्याचे नावच खरवड झाले असावे असे म्हटले जात़े परंतू गेल्या तीन महिन्यापासून येथील ग्रामस्थांची पाण्याअभावी परवड सुरु आह़े
नंदुरबार जिल्ह्याचा ग्रीन बेल्ट असलेल्या तळोदा तालुक्यात यंदा पाणीटंचाईयुक्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े यातील शहादा आणि तळोदा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या खरवड येथे गेल्या तीन महिन्यांपासून भिषण पाणीटंचाई आह़े नैसर्गिक जलस्त्रोत नसल्याने ग्रामपंचायतीने तत्कालीन धुळे जिल्हा अस्तित्वात असतानाच गावात एक आणि गावालगत एक अशा दोन पाणी योजना सुरु केल्या होत्या़ दोन्ही योजनांमधून गेल्या वर्षार्पयत मुबलक पाणी मिळत असल्याने पाणीटंचाई नावालाही नव्हती़ परंतू यंदा पावसाने हुलकावणी गाव शिवारात जलसिंचनच न झाल्याने ग्रामस्थांना प्रथमच टंचाईचा सामना करावा लागत आह़े ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या दोन्हींपैकी एक योजना कोरडी झाल्याने दुस:या योजनेतून मिळेल तेवढे पाणी साठवून ग्रामस्थांना दोन दिवसाआड देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आह़े परंतू सोडले जाणारे हे पाणी गावातील केवळ 1 हजार 224 ग्रामस्थांना पुरेसे नसल्याने त्यांची पाण्यासाठी इतररत्र फिरफिर होत आह़े येत्या काळात याठिकाणी योग्य त्या उपाययोजना न झाल्यास पाणीटंचाई भीषण होऊन ग्रामस्थांचे हाल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आह़े
एकीकडे गावात ही स्थिती असताना दुसरीकडे शेतशिवारातही गंभीर स्थिती आह़े बागायतदार शेतक:यांचे गाव असले तरी रब्बी हंगामात शेतशिवार पिकांअभावी ओसाड दिसून येत आह़े हंगामात पुरेल एवढे पाणी नसल्याने गहू, मका आणि ज्वारी या रब्बी पिके शेतक:यांनी नाईलाजाने टाळली आहेत़जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या मानाने छोटा तालुका असलेल्या तळोदा तालुक्याची भूजल पातळी यंदा अडीच मीटर्पयत खोल गेली आह़े प्रथमच भूजल खोल गेल्याने टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आह़े तालुक्यात 14 गावे यंदा गंभीर टंचाईग्रस्त असल्याची माहिती समोर आली आह़े यात खरवड, गंगानगर, खेडले, त:हावद, रोझवा पुनवर्सन, नर्मदानगर, करडे, बन, न्यू-बन आदी गावांचा समावेश आह़े या गावांमध्ये येत्या काळात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आह़े तालुका प्रशासनाने या 14 गावांमधील टंचाईचे सव्रेक्षण केले आह़े हा अहवाल लवकरच प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल गिरासे यांनी सांगितल़े अहवाल सादर झाल्यानंतर प्रशासनाकडून उपाययोजनांना निधी देण्यात येईल़ तोवर मात्र ग्रामस्थांना टंचाई सोसावी लागणार आह़े