किसान सन्मानसाठी ग्रामस्तरीय समित्यांकडून कुटूंबांचा धांडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:15 IST2019-06-18T21:15:30+5:302019-06-18T21:15:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची दोन हेक्टर क्षेत्राची अट शिथिल झाल्यानंतर जिल्हास्तरावर नवीन शेतकरी कुटूंब ...

किसान सन्मानसाठी ग्रामस्तरीय समित्यांकडून कुटूंबांचा धांडोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची दोन हेक्टर क्षेत्राची अट शिथिल झाल्यानंतर जिल्हास्तरावर नवीन शेतकरी कुटूंब सव्रेक्षणाला सुरुवात झाली आह़े जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्तरावर नियुक्त केलेली तलाठी व विस्तार अधिकारी यांची समिती गावोगावी भेट देत शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण करुन माहिती संकलित करत आह़े
फेब्रुवारी 2019 मध्ये केंद्रशासनाने शेतक:यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची प्रधानमंत्री किसान सन्मान ही योजना आणली होती़ याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील दोन हेक्टर्पयत जमिन क्षेत्र असलेल्या 950 गावातील 72 हजार 771 शेतकरी कुटूंबांचे फेब्रुवारीअखेरीस सव्रेक्षण करुन माहिती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती़ या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण 1 लाख 76 हजार 595 शेतकरी असल्याचे समोर आले होत़े पात्र ठरलेल्या या शेतक:यांपैकी एप्रिल महिन्यात सहा हजार शेतक:यांच्या खात्यावर रक्कम झाली होती़ त्यानंतर मात्र रडतखडत पैसे जमा होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े दरम्यान केंद्राने राज्य शासनाला पत्र देत दोन हेक्टरची अटच काढून टाकत सर्व शेतक:यांचा योजनेत सहभाग करुन घेण्याचे आदेश दिले होत़े
आदेशानंतर गेल्या आठवडय़ात नंदुरबार जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे शासनाने पत्र देऊन शेतकरी समावेशाची कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले होत़े यानुसार तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी आणि विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करुन शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण सुरु झाले आह़े या सव्रेक्षणाचा अंतिम अहवाल बुधवारी दुपारी प्राप्त होणार असून एकूण पात्र शेतक:यांची संख्या समोर आल्यानंतर केंद्रशासनाच्या संकेतस्थळावर त्यांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला सुरुवात होणार आह़े
शेतकरी कुटूंब सव्रेक्षणासाठी एकीकडे ग्रामस्तरीय समित्या कार्यरत असताना दुसरीकडे मात्र नंदुरबार तालुक्यातील ग्रामसेवकांनी सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांना पत्र देत किसान सन्मान योजनेसाठी काम करण्यास नकार दिला आह़े यामुळे योजनेच्या कामावर परिणाम होत असून नंदुरबार तालुक्यात ग्रामसेवकांविनाच सव्रेक्षण सुरु असल्याची माहिती देण्यात आली आह़े
राज्य ग्रामसेवक युनियनच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, 14 जून रोजी नंदुरबार तहसील कार्यालयात पीएम किसान योजनेची बैठक सुरु असताना नंदुरबार तहसीलदारांनी तालुक्यातील ग्रामसेवकांबद्दल अपमानास्पद भाष्य केले होत़े यापूर्वीही त्यांनी असेच भाष्य केल्याने ग्रामसेवक संवर्ग संबधित अधिका:यासोबत काम करणार नसल्याचे म्हटले आह़े याबाबत योग्य ती कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आह़े
जिल्हा प्रशासनाकडून आतार्पयत नंदुरबार तालुक्याच्या 155 गावांमध्ये 17 हजार 102 शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण झाले आह़े नवापुर तालुक्यातील 165 गावांमध्ये 13 हजार 327 शेतकरी कुटूंबे, शहादा तालुक्यात180 गावांमध्ये 16 हजार 174, तळोदा94 गावात 10 हजार 150, धडगाव तालुक्यात 162 गावांमध्ये 5 हजार 89 आणि अक्कलकुवा तालुक्यातील 10 हजार 829 पैकी 10 हजार 715 कुटूंबांचे सव्रेक्षण फेब्रुवारीअखेरीस झाले होत़े एकूण 72 हजार कुटूंबांच्या या सव्रेक्षणानंतर त्यातील बहुतांश जणांना सहा हजार रुपयेही मिळाल्याची माहिती आह़े आता नव्याने होणा:या सव्रेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाकडून 1 लाख 69 हजार 638 नमुना आठ अ दाखल्यांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत़ यातील कुटूंबप्रमुखांच्या नावाची माहिती हाती ठेवत नियुक्त समिती सव्रेक्षण करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े नंदुरबार तालुक्यात 38 हजार 952, नवापुर 24 हजार 658, शहादा 57 हजार 543, तळोदा 11 हजार 434, धडगाव 13 हजार 254 तर अक्कलकुवा तालुक्यातील 23 हजार 797 नमुना आठ अ दाखले अस्तित्त्वात आहेत़ यानुसार शेतक:यांची निश्चित संख्या समोर येणार असल्याचा दावा प्रशासनाचा आह़े गेल्या काळातील बोंडअळी वितरण आणि छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी अर्ज करणा:या शेतक:यांच्या याद्यांचाही धांडोळा घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आह़े