मुलभूत सुविधांपासून गाव वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:13 IST2020-09-12T12:13:45+5:302020-09-12T12:13:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत इच्छागव्हाणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नयामाळ येथे अद्यापही मुलभूत सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांना ...

मुलभूत सुविधांपासून गाव वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : तळोदा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत इच्छागव्हाणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नयामाळ येथे अद्यापही मुलभूत सुविधा नसल्याने तेथील ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पाड्यावर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्षा सीमा वळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इच्छागव्हाण ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाºया नयामाळ येथे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. परंतु आजही येथे वीज नाही, दळणवळणची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, भटकंती करीत पिण्यासाठी पाणी मिळवावे लागते. त्यामुळे या पाड्यावरील ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पाड्यावर मुलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत जि.प. अध्यक्षा सीमा वळवी यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी चर्चा केली. या वेळी भरतसिंग वसावे, जात्र्या वसावे, अशोक वसावे, विलास तडवी, धीरसिंग वसावे, अमरसिंग पाडवी, सुनील वसावे, हिंमत वसावे, सिंगा वसावे, नंदलाल वसावे, भरतसिंग वसावे, शामा वसावे, रमेश वसावे, गौतम वसावे, खेत्या वसावे, जगन वसावे, फोज्या वळवी, अशोक वसावे, जेरमा वसावे, भदूरसिंग वसावे, देहल्या वसावे, हुºया वसावे, दशरथ वसावे, अनिल वसावे, सायसिंग वसावे, भरत वसावे, गोण्या वसावे व ग्रामस्थ उपस्थित होते.