भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:02 IST2019-06-23T13:02:12+5:302019-06-23T13:02:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची निवड करण्यात आली आह़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहिर करण्यात आली़
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, ओबीसी खात्याचे मंत्री संजय कुटे, भाजप महामंत्री सुरजितसिंह ठाकूर, आमदार रामदास आंबडकर यांच्यासह विविध खात्याचे मंत्री, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होत़े मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांच्या नावाची घोषणा करुन नियुक्तीपत्र दिल़े तसेच खासदार डॉ़ हीना गावीत यांना भाजप युवमोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली़ या निवडीची माहिती नंदुरबार जिल्ह्यात मिळाल्यानंतर भाजप समर्थकांनी जागोजागी फटाके फोडून आनंद व्यक्त केला होता़
निवडीप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चाच्या अहवालाचे प्रकाश मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आल़े नूतन जिल्हाध्यक्ष चौधरी हे तीन वर्षापासून भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पहात होत़े