जैन सोशल ग्रुप प्लेटिनमतर्फे विहार सेवा समितीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST2021-02-24T04:32:47+5:302021-02-24T04:32:47+5:30
विहार सेवा समिती ही पदयात्रेने प्रवास करणारे जैन समाजातील धर्मगुरूंसमवेत प्रवास करुन त्यांची सेवा करते. त्यांच्या या सेवाभावाची दखल ...

जैन सोशल ग्रुप प्लेटिनमतर्फे विहार सेवा समितीचा गौरव
विहार सेवा समिती ही पदयात्रेने प्रवास करणारे जैन समाजातील धर्मगुरूंसमवेत प्रवास करुन त्यांची सेवा करते. त्यांच्या या सेवाभावाची दखल घेऊन येथील जैन सोशल ग्रुप प्लेटिनमतर्फे गिरीविहार वाडीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. जैन सोशल ग्रुप प्लेटिनमतर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार येथील विहार सेवा समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष महेंद्रकुमार दुग्गड यांच्या हस्ते सेवा समितीचे अध्यक्ष नरेंद्रकुमार श्रीश्रीमाळ व समितीच्या सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पहाटेच्या प्रवासात त्यांना सहकार्य व्हावे म्हणून बॅटरी (स्टॉर्च)चेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जैन सोशल ग्रुपच्या उपाध्यक्ष पीनल शाह, खजिनदार जयेश बाफना, उपसचिव शैलेश बोकाडिया, नितीन बलार, विक्की बाफना, धर्मेंद्र जैन, विजय जैन, महेंद्र तातेड, विनोद तातेड, रमेश बाफना व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.