Vidhan sbha 2019: नंदुरबार मतदार संघातील तीन केंद्रात होणार बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:17 IST2019-09-22T12:17:34+5:302019-09-22T12:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रात यंदा बदल करण्यात आला आहे. हे तिन्ही मतदान ...

Vidhan sbha 2019: नंदुरबार मतदार संघातील तीन केंद्रात होणार बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील तीन मतदान केंद्रात यंदा बदल करण्यात आला आहे. हे तिन्ही मतदान केंद्र नंदुरबार शहरातील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सुधळकर यांनी सांगितले, नंदुरबार मतदार संघात एकुण तीन लाख 38 हजार 625 मतदार आहेत. त्यात पुरुष एक लाख 70 हजार 429 तर महिला एक लाख 68 हजार 189 व तृतीय पंथी सात मतदार आहेत. एकुण 361 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी एक सहायकारी मतदान केंद्र असेल. नंदुरबारातील तीन मतदान केंद्रात बदल करण्यात आला आहे. त्यात अभिनव विद्यालयातील हे मतदान केंद्र आहेत. एकुण 36 झोन असून 40 क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाचे साहित्य वाटप आणि मतमोजणी देखील जिल्हा क्रिडा संकुलातच होणार असल्याची माहितीही सुधळकर यांनी दिली. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.