Vidhan Sabha 2019: खर्च निरिक्षकांकडून विविध पथकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:24 IST2019-10-01T12:24:38+5:302019-10-01T12:24:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : खर्च निरीक्षक रविंदर मित्तल यांनी आज सर्व पथक प्रमुखांची नवापूर तहसील कार्यालयात बैठक घेऊन ...

Vidhan Sabha 2019: Guidance to various team members from cost inspectors | Vidhan Sabha 2019: खर्च निरिक्षकांकडून विविध पथकांना मार्गदर्शन

Vidhan Sabha 2019: खर्च निरिक्षकांकडून विविध पथकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : खर्च निरीक्षक रविंदर मित्तल यांनी आज सर्व पथक प्रमुखांची नवापूर तहसील कार्यालयात बैठक घेऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता ज:हाड, राजेंद्र नजन, गोसावी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, सहायक खर्च निरीक्षक, स्थिर सर्वेक्षण पथकातील पथक प्रमुख, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मित्तल यांनी आचारसंहितेचे कठोर पालन करण्याच्या सुचना दिल्या. उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे आणि प्रचारादरम्यान करण्यात येणा:या प्रत्येक खर्चाची नोंद उमेदवाराकडून सादर होणा:या खर्चात होईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. पथकांनी निवडणूक काळात होणा:या पैसे, दारू आदीच्या वाहतुकीवर लक्ष ठेवावे. सिव्हिजिल या अॅपवर येणा:या तक्रारीचा त्वरित निपटारा करावा. 
वाहनाची तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभा, रॅली इ. चे चित्रीकरण करताना सर्व मंडप, खुर्ची, ङोंडे, बॅनर आदी विविध बाबींचे चित्रीकरण करावे. 
या मध्ये आढळणा:या प्रत्येक गोष्टीचा समावेश उमेदवार सादर होणा:या खर्चात करत आहेत किंवा नाही याकडे खर्च नियंत्रण कक्षाने  लक्ष ठेवावे अशा सुचना त्यांनी  दिल्या.     
 

Web Title: Vidhan Sabha 2019: Guidance to various team members from cost inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.