Vidhan sabha 2019 : युतीची प्रतिक्षा ; तर आघाडीत चलबिचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:14 IST2019-09-22T12:14:26+5:302019-09-22T12:14:53+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: ...

Vidhan sabha 2019 : युतीची प्रतिक्षा ; तर आघाडीत चलबिचल
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणुका जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: गेल्या महिनाभरापासून इच्छूक उमेदवारांनी या ना त्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढविल्याने राजकीय हवा तापविली आहे. सर्वच इच्छूक उमेदवारी मिळविण्याचे डावपेच आखत असले तरी अद्याप भाजप-शिवेसेनेची युती झाली नसल्याने त्याचा प्रतिक्षेत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी या पक्षातील काही इच्छुकांचे डोळेही भाजपच्या उमेदवारीकडे लागले असल्याने आघाडीतही सध्या चलबिचल निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी गेल्या निवडणुकीत नंदुरबार आणि शहादा या जागा भाजपने तर अक्कलकुवा आणि नवापूर या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यावेळी मात्र राजकारणाची स्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ब:यापैकी यश मिळविल्याने नव्या आणि जुन्या कार्यकत्र्यानाही भाजपचे वेध लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत तसेच काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य किरसिंग वसावे, गेल्यावेळी अक्कलकुवा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार विजय पराडके यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नवापूर, अक्कलकुवा आणि शहादा या तीनही मतदारसंघात कार्यकत्र्याचे राजकीय स्थित्यंतर झाले आहे.
याशिवाय अजूनही काही मातब्बर व उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या कार्यकत्र्यानीही भाजपकडूनच उमेदवारी मिळावी यासाठी प्रय}रत आहेत.
दुसरीकडे भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही याबाबत सर्वाचे लक्ष असून एक वरिष्ठ नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युती झाली तर भाजपला कोणत्या जागा आणि शिवसेनेला कोणत्या जागा मिळतील याबाबतही अंतर्गत कलहाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी सर्वजागा काँग्रेसलाच मिळणार असल्याची चर्चा आघाडीत सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
वंचीत बहुजन आघाडी नाराजांवर डोळा ठेवून असून ऐनवेळी आयते निवडणुक लढविण्यासाठी मजबूत उमेदवार कसे मिळतील यासाठी प्रय}शील आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील राजकारण कसे वळण घेते याकडे आता सर्वाचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील प्रचाराची धूरा बिगर आदिवासी नेत्यांकडे राहणार आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भुमिका महत्वाची राहणार आहे. तर भाजपची धूरा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील सांभाळतील
पद्माकर वळवी व राजेंद्र गावीत यांची प्रतिष्ठा पणाला
तब्बल तीन वेळा आमदार म्हणून विजयी झालेले व राज्यमंत्री आणि कॅबीनेट मंत्री म्हणून पदावर राहिलेले अॅड.पद्माकर वळवी यांची मात्र यावेळी कसोटी आहे. गेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी देखील ते काँग्रेसतर्फे इच्छूक होते. यावेळी मात्र शहादा मतदारसंघातून ते इच्छूक आहेत. ही जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत हे देखील मात्र उमेदवारीसाठी आघाडीतर्फे दावेदार असल्याने या ठिकाणी उमेदवारी मिळविण्यासाठी दोघांची कसोटी आहे.
15 ते 30 वर्ष लोकप्रतिनिधी..
जिल्ह्यात विजयाची डबल हॅट्रीक करणारे विद्यमान तीन आमदार आहेत. त्यापैकी आमदार अॅड.के.सी.पाडवी हे सलग सातवेळा विजयी झाले आहेत. सुरुवातीला जनता दल, अपक्ष आणि काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. तर डॉ.विजयकुमार गावीत हे सलग सहा वेळा निवडणुकीत विजयी झाले आहेत. सुरुवातीला अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक हे देखील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. 1981 ते 2009 र्पयत ते सतत आमदार राहिले आहेत. 2009 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंततर 2014 मध्ये ते पुन्हा निवडून आले. काँग्रेसचे ते एकनिष्ठ राहिले.
नंदुरबारात काँग्रेस तरुण चेहरा देणार
4नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉ.विजयकुमार गावीत यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे यापूर्वी माजी आमदार इंद्रसिंग वसावे, कै.प्रताप वळवी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यश आले नाही. यावेळी पुन्हा नव्या तरूण चेह:याचा शोध सुरू आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.राजेश वळवी यांचे नाव चर्चेत आहे.
राजकीय घराण्यातील नवे वारसदार मैदानात उतरणार..
4जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक, तब्बल नऊ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारे ज्येष्ठे नेते माणिकराव गावीत, तब्बल सहा वेळा विधानसभा निवडणूक जिंकून व मंत्रीपदावर राहून काँग्रेसला शह देणारे डॉ.विजयकुमार गावीत या तिन्ही नेत्यांच्या राजकीय घराण्यातील वारसदार या निवडणुकीत मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
4 माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवापूर मतदारसंघातून यावेळी भाजपतर्फे निवडणुकीसाठी ते इच्छूक आहेत. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे वय 82 झाले आहे. वयोमानाने ते थकल्याने नवापूर मतदारसंघातून यावेळी काँग्रेसकडून त्यांचे पूत्र शिरिष नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
4डॉ.विजयकुमार गावीत यांच्या लहान कन्या डॉ.सुप्रिया गावीत या देखील यावेळी अक्कलकुवा अथवा इतर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकारणातील नवी पिढी मैदानात दिसेल असे चित्र आहे.