शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

Vidhan sabha 2019 : आला वासुदेव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:32 IST

उठा, उठा.. निवडणूक आली..! लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना ...

उठा, उठा.. निवडणूक आली..!

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पूर्ण पावसाळा पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या मराठवाडय़ातून शनिवारी वासुदेवचे आगमन नंदुरबार रेल्वेस्थानकावर झाले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास नंदुरबारच्या रेल्वेस्थानकावर पाऊल ठेवताच त्याच्या कानावर पहिला शब्द पडला तो निवडणूक लागली.. आचारसंहिता लागली.. हा शब्द ऐकताच वासुदेव अगदी प्रफुल्लीत झाला. खूप दिवस दुष्काळामुळे मराठवाडा भागात चांगले दान मिळाले नव्हते. दोनवेळचे भागणे कठीण होते. अशा स्थितीत नंदुरबारसारख्या भागात चांगले दान मिळेल या आशेने आलेल्या वासुदेवाला खूप आनंद झाला. निवडणूक लागली म्हणजे आपले सर्व स्वप्ने पूर्ण होतील. गेल्यावेळी प्रमाणेच खूप चांगले दान मिळेल. पिंटय़ाचे शिक्षण पूर्ण होईल, बेबीचे लग्नही करता येईल, हातातील तुटलेला मोबाईल नवा घेता येईल.. असे कितीतरी आशा-अपेक्षांचा भविष्यातील स्वप्नात तो बुडाला आणि रेल्वेस्टेशन त्याने सोडले. थोडेसे पायी चालल्यानंतर पुढे त्याला माणसांचा घोळका दिसला. त्याने त्याचठिकाणी नंदुरबार आणि जिल्ह्यातील पानकाळा आणि राजकीय स्थितीचा कानोसा घेतला. यंदा जिल्ह्यात 100 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती त्याला मिळाली. राजकारणातही एका पक्षाच्या उमेदवारीसाठी खूप जण इच्छुक असल्याची माहिती त्याने काढली. तिकीट मिळविण्यासाठी इच्छुकांच्या प्रयत्नांचे किस्सेही त्याने ऐकले. हे सर्व ऐकल्यानंतर वासुदेव अजूनच आनंदीत झाला. या वेळी तर निवडणुकीत खूप भरभरुन दान मिळेल या स्वप्नात तो पुन्हा बुडाला. भविष्याचे स्वप्न रंगवत असतानाच दान मागण्यासाठी तयारीचेही नियोजन त्याने सुरू केले. या वेळी कुठल्या देवदेवळात, मंदिरात नव्हे तर हॉटेलातच मुक्काम ठोकायचा त्याने निर्णय घेतला आणि एका चांगल्या हॉटेलचा पत्ता विचारत धुळे रोडकडे त्याने प्रस्थान केले. झपझप पाऊले टाकत असताना अनेक विचार तो करू लागला. पायी जात असतानाच आमदार कार्यालयासमोर खुच्र्यावर काही लोक निद्रीस्त अवस्थेत बसलेले दिसले. वासुदेव चकीत झाला, आमदार कार्यालय आणि कार्यकर्ते झोपलेले.. तो क्षणभर तेथे थांबला. कार्यकत्र्याजवळ गेला पण ते निद्रीस्त असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वासुदेवाने तेथेच आपली फिरकी घेत ‘वासुदेव आला.. वासुदेव आला..’ गीत सुरू केले. हातातील टाळ-चिपळ्यांच्या निनादात त्याने आपल्या शैलीत कार्यकत्र्यानाही जागे करण्यासाठी ‘उठा.. उठा.. निवडणूक आली.. विधानसभेची निवडणूक आली.. आपला आमदार निवडण्याची वेळ आली.. उठा.. उठा..’चा सूर धरला. तेवढय़ात कार्यकर्तेही जागे झाले. वासुदेवाने निवडणुकीकडे लक्ष वेधताच निवडणुकीच्या तारखांवर चर्चा सुरू झाली. वासुदेवाला कार्यकत्र्यानी दान दिले. हे दान घेऊन ‘आला रे आला वासुदेव आला..’  असे म्हणत तो हॉटेलकडे रवाना झाला..                                                                                                                                                                                                      -वासुदेव