कोरोना लसीकरणाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST2021-05-19T04:32:12+5:302021-05-19T04:32:12+5:30

कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये झालेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन, सेवाभावी संस्थांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीमुळे दुर्गम भागातील नागरिकही ...

Video of corona vaccination liked on social media | कोरोना लसीकरणाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती

कोरोना लसीकरणाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर पसंती

कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये झालेला गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासन, सेवाभावी संस्थांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीमुळे दुर्गम भागातील नागरिकही आता लसीकरणासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होत आहे.

रांझणी व जीवननगर पुनर्वसन येथील ग्रामसेवक मुकेश कापुरे यांनी पावरा भाषेत लसीकरणाबद्दल गैरसमज, लसीकरणाचे महत्त्व याविषयी सखोल माहिती देणारा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलाच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो समूहाने पाहण्यात येत आहे. हा व्हिडिओ स्थानिक पावरा भाषेत असल्याने व त्यात नमूद केलेले मुद्दे नागरिकांना पटत असल्याने जनजागृती होऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणास मदत होत आहे.

Web Title: Video of corona vaccination liked on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.