Vidahn Sabha 2019: निवडणूक डय़ुटी असलेल्या शिक्षकांची होतेय दुहेरी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:03 IST2019-10-15T13:03:20+5:302019-10-15T13:03:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगू लागला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त आहेत. दुसरीकडे मात्र ...

Vidahn Sabha 2019: निवडणूक डय़ुटी असलेल्या शिक्षकांची होतेय दुहेरी कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगू लागला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त आहेत. दुसरीकडे मात्र शिक्षक वर्गाला दुहेरी कसरत करावी लागत आहे. एकीकडे परीक्षा, पेपर तपासणी आणि दुसरीकडे निवडणुकीच्या डय़ुटी आहे. परिणामी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला अनेकजण गैरहजर होते तर अनेकांनी डय़ुटी रद्द करून घेतली.
निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी प्रचाराची रंगत वाढली आहे. गावोगावी प्रचार रंगात आला आहे. निवडणुकांचे कामकाज देखील वेगात आले आहे. निवडणूक कर्मचा:यांचे दोन प्रशिक्षणे पुर्ण झाली आहेत. परंतु याच कालावधीत पहिलीपासून ते महाविद्यालयीन स्तरार्पयतच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांना प्रश्नपत्रिका काढणे, परीक्षा घेणे, पेपर तपासणी याशिवाय शाळांचे दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामकाजाला सामोरे जावे लागत आहे.
पहिले प्रशिक्षण तालुकास्तरावर अर्थात स्थानिक ठिकाणी झाले. दुसरे प्रशिक्षण नेमून दिलेल्या तालुक्यात अर्थात दुस:या तालुक्यात होत आहे. त्यामुळे त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी कर्मचा:यांना जावे लागत आहे. शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी प्रशिक्षण ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. निवडणूक, जनगणना वगैरे कुठलेही काम आले म्हणजे शिक्षकवर्गच डोळ्या समोर येतो. आता या विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना सहामाई परीक्षा काळातच निवडणूकी संदर्भाच्या बैठका, प्रशिक्षणांना जावे लागत आहे.
मतदानाच आधीचा दिवस, मतदानाचा दिवस आणि मतदानाचा दुसरा दिवस असे तीन दिवस देखील कर्मचा:यांना याच कामात अडकून पडावे लागणार आहे. एकुणच शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी होणारी कसरत आणि एकुणच शालेय कामकाज या निवडणुकीत जिकरीचे ठरत आहे.