शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात 104 रुग्ण ह्रदयविकाराचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:28 IST

जागतिक ह्रदय दिन : जिल्हा रूग्णालयातर्फे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

नंदुरबार : देशात वर्षभरात किमान 3 दशलक्ष नागरिकांचा ह्रदयरोगाने मृत्यू होतो़ जागतिक ह्रदय फेडरेशनने नुकतीच ही आकडेवारी प्रसिद्ध केली होती़ ताणतणाव, प्रदूषण, दिनचर्येतील अनियमितता यामुळे केवळ शहरी भागात फोफावणारा ह्रदयरोग आता ग्रामीण भागातही फोफावत असून गेल्या वर्षभरात नंदुरबार जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल 104 जणांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला आह़े प्रदूषण मुक्त अन् धकाधकीच्या आयुष्याच्या सं™ोत न बसणारा म्हणून नंदुरबार जिल्हा ओळखला जातो़ मलेरिया, सिकलसेल, हत्तीरोग यासह पावसाळी जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न होत असताना गत पाच वर्षात ह्रदयरोगींचे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली आह़े यात प्रामुख्याने ताणतणाव, वजन वाढणे, तंबाखूजन्य पदार्थाचे सातत्याने सेवन, शारिरिक निष्क्रियता, मद्यपानाचे वाढते प्रमाण, अनुचित आहार, मिठाचे प्रमाणपेक्षा अधिक सेवन, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल मुधमेह आणि रक्तदाबाचे अनुवांशिक आजार यामुळे ह्रदयरोगाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र आह़े आर्थिक वर्षाच्या हिशोबाने 104 जणांचा मृत्यू ही रितसर नोंद आह़े शहरी व ग्रामीण भागात उपचारापूर्वी मृत्यू होणा:यांचीही संख्या अधिक आह़े अशा रूग्णांना लक्षणे दिसल्यानंतर मदत करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आह़े जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षात 66 नागरिकांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर जिल्हा रूग्णालयात आणले गेले होत़े याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता़ तर चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या कालावधीत 38 जणांचा ह्रदयविकाराने बळी घेतला आह़े सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी समोर आलेली नाही़ मयतांमधील 55 टक्के रूग्ण हे वयाची पन्नाशीही ओलांडलेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े  गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत जाणा:या ह्रदयरोगाबाबत अधिक खोलवर जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा रूग्णालयातर्फे 29 सप्टेंबर रोजी साज:या होणा:या जागतिक ह्रदयदिनानिमित्त असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आह़े साधारण ऑक्टोबरच्या पंधरवाडय़ार्पयत हा कार्यक्रम सुरू राहतो़  कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षात अडीच हजार नागरिकांच्या विविध तपासण्या करण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आह़े यंदाही जिल्हा रूग्णालयात रक्तदाब आणि शुगर तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय आणि उपजिल्हा रूग्णालयांतर्गत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आह़े जिल्ह्यात 59 प्राथमिक आरोग्य, 11 ग्रामीण रूग्णालय, 2 उपजिल्हा रूग्णालये आणि 1 सामान्य रूग्णालय आह़े आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयात ह्रदयविकाराने ग्रस्त असलेला रूग्णाला अतीदक्षता म्हणून जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात येत़े याठिकाणी उपचार देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था आह़े ह्रदयविकारासंबधी जनजागृती होण्यासाठी रूग्णालयात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कक्षाची स्थापना करण्यात आली आह़े या कक्षात रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आहारासह ताणतणावमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यात येत़े 4ह्रदय दिनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारपासून असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाकडून मोहिमेला सुरूवात करण्यात येणार आह़े यांतर्गत 30 वर्षावरील नागरिकांची मोफत रक्तदाब तपासणी, शुगर चाचणी, मुख आणि ह्रदय तपासणी करण्यात येणार आह़े यातून धोकेदायक स्थितीत असलेल्या रूग्णांना जिल्हा रूग्णालयात उपचार देण्यात येणार आहेत़ छातीत दुखणे, दबाव किंवा शारिरिक श्रमानंतर अपचनाचा त्रास, खांदा किंवा डाव्या-उजव्या हातामध्ये वेदना होणे, मानसिक ताणतणाव, जबडय़ात वेदना होणे, परिश्रमानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, चढाई किंवा पाय:या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असलेल्या रूग्णांना कक्षातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ हार्दिक पटेल यांनी दिली आह़े कक्षाकडून गंभीर ह्रदयरोग तसेच ह्रदयावर क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या जाणा:या गोरगरीब रूग्णांना मुंबई आणि राज्यातील अत्युच्च दर्जाच्या रूग्णालयात पाठवण्याची सोय केली जात़े