सारंगखेड्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:58 IST2020-06-22T12:58:40+5:302020-06-22T12:58:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील ...

Veterinary dispensary in Sarangkheda on air | सारंगखेड्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

सारंगखेड्यातील पशुवैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात पाळीव जनावरांवर विविध आजारांची साथ येते. येथील पशुधन अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मालेगाव येथे उपचार घेत आहेत. तर कर्मचारी होम क्वारंटाईन झाले आहेत. त्या दिवसापासून हा दवाखाना वाºयावर आहे.
२९ मे रोजी येथील पशुधन विकास अधिकारी यांचा कोरोनाचा पॉझिटीव्ह अहवाल आल्यापासून येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर अथवा कर्मचारी कार्यरत नसल्याने पाळीव जनावरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हशी, शेळीपालन व दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करतात. मात्र वेळीच त्यांच्या जनावरांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. अशावेळी लसीकरण करणे आवश्यक आहे. पशूपालकांची समस्या लक्षात घेता पशूसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याप्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी या भागातील पशुपालकांनी केली आहे.
मालेगाव येथील रहिवासी असलेले पशुधन विकास अधिकारी यांना २८ मे पासून कोरोनाची लागण झाली असल्याने ते मालेगाव येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले येथील कर्मचारी विलगीकरण कक्षात क्वारंटाईन झाले होते. त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर निगेटीव्ह अहवाल आल्यानंतर १४ दिवस होमक्वारंटाईन केले आहे. तसेच याबाबत चौकशीही सुरु असल्याने येथील पशूवैद्यकीय दवाखाना सध्या तरी वाºयावर आहे.

सारंगखेडा गावापासून काही अंतरावर पशूवैद्यकीय दवाखान्याची सुसज्ज इमारत आहे. या इमारतीजवळ गुरांची तपासणी करण्यात येते. गुरांना लसीकरण, इंजेक्शन देऊन रिकाम्या काचेच्या बाटल्या फेकल्या जात असल्याने जवळच काचेचा ढीग पडला आहे. या इमारतीजवळून लोकांचे येणे-जाणे असते. काहीवेळा काचेवर पाय पडल्याने दुखापतीही झाल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी मुले याच रस्त्यावरून शाळेत जाताना अनेकांच्या पायात काच टोचल्याने दुखापती झाल्या आहेत. याबाबत तक्रार करूनही धोकेदायक इंजेक्शनच्या काचेचा बाटल्या तशाच पडून आहेत.

Web Title: Veterinary dispensary in Sarangkheda on air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.