ज्येष्ठ साहित्यिक रमेश डी.चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:49 IST2018-03-09T12:49:54+5:302018-03-09T12:49:54+5:30

Veteran literary writer Ramesh D. Chavan passed away | ज्येष्ठ साहित्यिक रमेश डी.चव्हाण यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक रमेश डी.चव्हाण यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार रमेश धर्मा चव्हाण (74) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सायंकाळी चार वाजता नवापूर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार आहे.
रमेश चव्हाण हे कवी, गझलकार व कथा लेखक होते. त्यांचे अनेक कविता व गझल संग्रह प्रकाशीत झाले आहेत. नवापूर येथील साईनाथ सेवा मंडळ, साईबाबा मंदीर यांचे संस्थापक होते. जिल्हा व विभागीय साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहत होता. पत्रकारीतेत देखील त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अशाही स्थितीत त्यांची साहित्य सेवा सुरू होती.  नवापूर येथील डॉ.मनोज चव्हाण, साहित्यिक विपीन चव्हाण यांचे वडील तर अंकुर साहित्य संघाच्या नवापूर शाखेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांचे ते काका होत.

    

Web Title: Veteran literary writer Ramesh D. Chavan passed away