व्यासयिकांनी स्वच्छेने काढले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 12:03 IST2019-12-12T12:03:10+5:302019-12-12T12:03:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना ...

Vesicators cleanly remove encroachments | व्यासयिकांनी स्वच्छेने काढले अतिक्रमण

व्यासयिकांनी स्वच्छेने काढले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : काही दिवसांपासून शहाद्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम विषयी चर्चा सुरू होती. या अनुषंगाने पालिकेने अतिक्रमणधारकांना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अतिक्रमणधारकांनी स्वत:च अतिक्रमण काढत पालिकेला सहकार्य केले. यामुळे पालिकेचा वेळ व आर्थिक खर्च वाचला.
शहाद्याच्या प्रमुख रस्ते व अन्य भागात व्यवसायिकांनी आपला व्यवसाय उभारला होता. यामुळे मुख्य रस्त्यांवर रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यात भाजी मार्केट, मेन रोड, चार रस्ता, डोंगरगाव रोड, स्टेट बँक परिसर, खेतिया रोड आदी भागात मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले असून ते कच्चे व पक्के दोन्ही प्रकारचे असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याचे संबाधित व्यापाऱ्यांना पालिकेमार्फत आवाहन करण्यात आले होते. त्याला साद देत अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढले. त्यामुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसत आहे.
प्रशासनातर्फे शहरात फेरी काढून राहिलेले अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले. अतिक्रमण न काढल्यास पालिकेतर्फे कारवाई करण्यात येईल व अतिक्रमण धारकांकडूनच खर्च वसूल करण्यात येईल असेही सांगण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन पाटील, माधव गाजरे, मंडळाधिकारी प्रमोद अमृतकर, अभियंता संदीप टेंभेकर, आशिष महाजन, संदीप चौधरी, सचिन महाडिक, राजू चव्हाण व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी व पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
मागील वर्षी तत्कालीन प्रशासनानेही शहरात वाढलेली अतिक्रमणे काढली होती. मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे अतिक्रमणे पुन्हा वाढले. या वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहाद्याची ओळख बदलू लागली होती. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यवसायिकांच्या बाबतीत दुजाभाव न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वच अतिक्रमण काढायवे अशी सामान्य जनतेची मागणी आहे. शिवाय पक्के अतिक्रमणही काढून सर्वसामान्यांना पालिका प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरात किरकोळ व्यवसायिकांची संख्या अधिक आहेत. त्यात लोटगाडीधारक व टपरीधारकांचा समावेश आहे. हे व्यवसायिक आपला व्यवसाय रस्त्यावर थाटत आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. म्हणून या लॉरी धारकांना पालिका प्रशासनाने एखादी जागा उपलब्ध करून दिल्यास वाहतूक मोकळी होईल.

काढलेल्या टपºया व लाºया सर्व अतिक्रमण धारकांनी प्रेस मारुती मैदान, स्टेट बँक परिसर, पंचायत समिती कार्यालय व त्या समोरील कृषी विभाग, जलसंधारण व लघुपाटबंधारे कार्यालच्या मोकळ्या जागेत आणून ठेवल्या आहेत. काही दिवसात अतिक्रमण परत पूर्ववत करू आणि या जागेवरून उचलून परत पूर्ववत जागेवर ठेऊ अशा आशेने अतिक्रमण धारकांनी टपºया जवळपासच ठेवल्या आहे.

Web Title: Vesicators cleanly remove encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.