नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने जप्त केलेली वाहने पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:26+5:302021-05-26T04:31:26+5:30
पोलीस कर्मचा-याने दाखवले धैर्य आग दिसून आल्यानंतर पोलीस कर्मचा-यांनी याठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वसावे यांनी धैर्य ...

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने जप्त केलेली वाहने पेटली
पोलीस कर्मचा-याने दाखवले धैर्य
आग दिसून आल्यानंतर पोलीस कर्मचा-यांनी याठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वसावे यांनी धैर्य दाखवत पेटत्या गाडीतील सीएनजी इंधनाच्या टाकीवर पाण्याचा वर्षाव केला. यातून आग काहीअंशी कमी होवून स्फोट होण्याचा धोकाही टळला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक धीरज चाैधरी यांच्या सूचनेनुसार आग वाढू नये म्हणून पोलीस कॉन्स्टेबल भटू धनगर, हेमंत बारी, राहुल पेंढारकर आदींनी ट्रॅक्टर व इतर वाहने बाजूला करत धोका टाळला. आगीत जळालेल्या वाहनांपासून काही फुटांवर शासकीय कर्मचारी निवासस्थान आहे. याठिकाणी एक-दोन कुटूंबांचे वास्तव्य आहे. तसेच समोरील बाजूस रेल्वे कॉलनीतील घरे आहेत. सीएनजी वाहनाच्या टाकीचा स्फोट झाला असता, तर मोठा अनर्थ झाला असता, परंतू पोलीस कर्मचा-यांनी धैर्याने अग्नीशामन बंब येईपर्यंत आगीवर नियंत्रण ठेवले होते.
पोलीसांकडून वाहने घेवून जाण्यासाठी दिली आहेत पत्र
आग लागलेली दोन्ही वाहने २०१८ या वर्षातील गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहेत. याठिकाणी इतर सहा वाहने आणखी आहेत. जळून खाक झालेल्या दोन्ही वाहनांच्या मालकांना पोलीसांकडून पत्र देवून वाहने घेवून जाण्याचे सूचित करण्यात आल्याची माहिती आहे. परंतू त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली. अज्ञात व्यक्ती या भागात धुम्रपान करत असताना ही आग लागल्याचा अंदाज आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात अग्नीउपद्रव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.