वेगवेगळ्या घटनेत शहादा व मोलगीतून वाहन चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:53 IST2019-05-15T11:53:17+5:302019-05-15T11:53:35+5:30
नंदुरबार : शहादा व मोलगी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत अनुक्रमे दुचाकी व बोलेरो वाहनांची चोरी करण्यात आली आहे़ ...

वेगवेगळ्या घटनेत शहादा व मोलगीतून वाहन चोरी
नंदुरबार : शहादा व मोलगी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत अनुक्रमे दुचाकी व बोलेरो वाहनांची चोरी करण्यात आली आहे़
पहिल्या घटनेत शहादा येथील दशरथ नगर शहादा येथील भास्कर सुभाष सोनवणे यांच्या घरासमोर लावलेली साधारणत: २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्रमांक जीजे ०५ केजे १४५५) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरी झाली़ याबाबत शहादा पोलीस ठाण्यात भास्कर सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक ईशी करीत आहेत़
दुसऱ्या एका घटनेत मोलगी येथील बैल बाजारातून रविवारी दुपारच्या सुमारास २ लाख २० हजार किमतीचे बोलेरो वाहन (क्रमांक एमएच ३९ डी ०७२६) चोरण्यात आले आहे़
जमाना ता़ अक्कलकुवा येथील व्यापारी रविंद्र सना पाडवी (२५) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस नाईक वळवी करीत आहेत़