वाहन विक्रीच्या अमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:13 IST2020-02-12T12:13:00+5:302020-02-12T12:13:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : तालुक्यातील कुकराण येथील एकाला ओलएक्स अ‍ॅपवर वाहन खरेदी करण्याचे अमिष देत त्याच्याकडून आॅनलाईन पद्धतीने ...

Vehicle sales fraud | वाहन विक्रीच्या अमिषाने फसवणूक

वाहन विक्रीच्या अमिषाने फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : तालुक्यातील कुकराण येथील एकाला ओलएक्स अ‍ॅपवर वाहन खरेदी करण्याचे अमिष देत त्याच्याकडून आॅनलाईन पद्धतीने १ लाख ४० हजार रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी नवापुर पोलीस अज्ञात ‘ठगा’विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़
कुकराण येथील विपुल साकऱ्या गावीत या युवकाला चारचाकी वाहन खरेदी करावयाचे असल्याने त्याने ओलएक्स अ‍ॅपवर माहिती घेतली होती़ दरम्यान १ ते २५ डिसेंबर २०१९ या कालावधीत त्याने पसंत केलेल्या वाहनाची अ‍ॅपद्वारे किंमत ठरवून एकाने विपुल सोबत संपर्क केला होता़ दरम्यान सौदा ठरुन १ लाख ४० हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ वाहन विक्री करणाºयाने भूलथापा दिल्याने विपुल गावीत याने संबधिताच्या बँक खात्यात १ लाख ४० हजार रुपयांची रक्कम जमा करुन दिली होती़ यानंतर वाहन मिळेल अशी अपेक्षा होती़ परंतू वाहन न मिळाल्याने त्याने वाहनविक्रेत्यासोबत संपर्क करण्यास सुरुवात केली होती़ यावेळी देण्यात आलेले सर्व मोबाईल नंबर बंद केल्याने प्रतिसादच मिळत नव्हता़ वाहनखरेदीत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विपुल गावीत याने पोलीस अधिक्षकांकडे अर्ज दाखल करुन माहिती दिली होती़ त्याची दखल घेत पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाईला प्रारंभ झाला होता़
याबाबत विपुल गावीत याने सोमवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात भामट्याच्या विरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़

Web Title: Vehicle sales fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.