आवक घटल्याने भाजीपाला दरात झाली मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:23 IST2019-04-21T20:23:36+5:302019-04-21T20:23:56+5:30
नंदुरबार : वाढते तापमान, पाण्याची कमतरता व दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात भाजीपाला आवक घटली असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ त्यामुळे ...

आवक घटल्याने भाजीपाला दरात झाली मोठी वाढ
नंदुरबार : वाढते तापमान, पाण्याची कमतरता व दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबारात भाजीपाला आवक घटली असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच भाजीपाला दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्याचे दिसून येत आहे़
नंदुरबारातील पश्चिम पट्टयातून भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते़ त्यासोबतच बाहेरुन येत असलेल्या भाजीपाल्याचीही आवक मंदावली असल्याने साहजिकच भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे़ सुरुवातीला साक्री तसेच महाराष्ट्र व गुजरात राज्यातील सिमावर्ती भागातील शेतकऱ्यांकडून बाजार समितीत भाजीपाल्याची आवक करण्यात येत होती़ परंतु वाढत्या तापमानामुळे ती आवकही मंदावली असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे अनेक पोकळा, गवारसारख्या भाज्यांची आवक अत्यंत मंदावली असल्याचे दिसून येत आहे़
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात तापमानाचा पारा साधारणत: ४२ अंशापर्यंत गेला होता़ त्याआधीदेखील तापमान चाळीशीच्या जवळपासच होते़ त्यामुळे भाजीपाला पिकांचे यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे़
गेल्या वर्षी केवळ ६७ टक्के इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ निर्माण झालेला आहे़ यात पाण्याअभावी भाजीपाला पिक तग धरु न शकल्याने साहजिकच पिक जळून भाजीपाला उत्पादक शेतकºयांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते़
-----------------
प्रकाश आंबेडकर यांची २३ रोजी नंदुरबारात सभा
नंदुरबार : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ सुशिल अंतुर्लीकर यांच्या प्रचारार्थ भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची २३ एप्रिल रोजी नंदूरबार मध्ये सभा होणार आहे.
भारिप बहुजन महासंघाचे महासचिव डॉ. प्रकाश शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीला भारिपचे औरंगाबाद विद्वत्त सभेचे डॉ.किशोर वाघ, प्रा. भगवान गव्हाळे, भारिपचे जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. सुशील अंतुर्लीकर, डॉ. देविदास शेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नियोजनासंबंधी चर्चा करण्यात आली.