जिल्ह्यात आदिवासीदिनी विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:54+5:302021-08-13T04:34:54+5:30
बामखेडा : आर.एफ.एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा येथे विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत ‘जागतिक आदिवासी दिन’ ...

जिल्ह्यात आदिवासीदिनी विविध कार्यक्रम
बामखेडा : आर.एफ.एन.एस. वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा येथे विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, शहादाचे साहाय्यक प्रा. खुमानसिंग वळवी उपस्थित होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. भरत पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद जोगदंड, साहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राजेश्वरसिंग पाडवी आणि सहकारी, विद्यार्थी प्राध्यापकेतर कर्मचारी अशा सर्व मिळून ४५ जणांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला.
विद्यापीठाच्या सूचनेचे पालन करून कार्यक्रमासाठी डॉ. जुबेर शेख, डॉ. योगेश दुशिंग, प्रा. अंकुश खोब्रागडे, डॉ. विजय पाटील, प्रा. डॉ. मनोज मुधोळकर, प्रा. गोपाल शेंडे, प्रा. विनिश चंद्रन, प्रा. गोटू सूर्यवंशी, योगेश महाजन, कांतिलाल पाटील, मनीष पाटील, जगदीश पटेल, नारायण पाटील, प्रशांत पिंपरे, भगवान पाटील, भरत साळवे, दिनेश इशी, अंकुश ठाकरे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भरत पाटील यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. विनोद जोगदंड यांनी आभार मानले.
ग्रामपंचायत, विसरवाडी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे विविध क्षेत्रांत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी नियमांचे काटेकोर पालन करून ‘विश्व आदिवासी गौरव दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच आद्य क्रांतिकारक तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा, करजनसिंग ऊर्फ खाज्या नाईक, तंट्या भिल, राणा भिल, भारतीय हॉकी संघाचे कर्णधार गोल्डमॅन मोरंग गोमा के ऊर्फ डॉ. जयपालसिंग मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीष नाईक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बकाराम गावित, जिल्हा परिषद सदस्य शैलेश गावित, भारतीय ट्रायबल पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष के. टी. गावित, ॲड. रामू वळवी, पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित, शिवाजी गावित, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमू गावित, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, तलाठी नरेंद्र महाले, हळदाणी ग्रामपंचायत उपसरपंच जया गावित, मनोज गावित, दीपेश गावित, आदी उपस्थित होते.
माणिकरावजी गावित विद्यालय, विसरवाडी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील माणिकराव गावित विद्यालयात देवमोगरा माता, खाज्या नाईक, तंट्या भिल, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन पर्यवेक्षक एम. एस वळवी, व्ही. एन. वळवी, सविता गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्राचार्य एस. एच. सोनार, उपप्राचार्य एन. बी. अहिरराव, संस्कृती समितीतील शिक्षक एस. आर. मोरे, यू. बी. जगताप, आशा देवरे, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एम. एस. वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक कला, वाणिज्य महाविद्यालय, विसरवाडी
विसरवाडी येथील सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने जागतिक आदिवासी व क्रांती दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. राजवीरेंद्रसिंग गावित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. टी. पाटील होते.
प्रा. बी. व्ही. गावित यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आनंदा काळबांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रा. अजित हिरकणे, डॉ. विशाल करपे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.