रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:08+5:302021-08-24T04:34:08+5:30
नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राखी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ...

रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रम
नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राखी बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावीच्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधन साहित्यातून व टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक राख्यांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक डी.एस. खंडारे यांनी मार्गदर्शन केले. लहान गटातून संध्या पुणिलाल सूर्यवंशी, मयूरी प्रवीण गांगुर्डे, कामिनी संतोष गायकवाड व मोठ्या गटातून अस्मिता दिलीप वळवी, संजना राजेंद्र गवळी, नीतेश विजय पवार या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांना बक्षीस मिळाले. सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्य पुष्प रघुवंशी यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हिंदू सेवा साहाय्य समिती, नंदुरबार
नंदुरबार येथे रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त हिंदू सेवा साहाय्य समितीच्या महिला विभागाने सामूहिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोठा मारुती मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना महिला मंडळाचा भगिनींनी राखी बांधली. यावेळी आलेल्या मान्यवरांचा आणि समितीच्या कार्याचा परिचय हिंदू सेवा साहाय्य समितीचे डॉ.नरेंद्र पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन रत्नमाला कुमावत, नम्रता परदेशी, माधुरी मराठे, गायत्री डाबी, जयश्री राजपूत, नीता पाटील तर कार्यक्रमासाठी राजू चौधरी, सुमित परदेशी, सुयोग सूर्यवंशी, मयूर चौधरी, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, जितेंद्र मराठे, मुकेश माळी आदींनी परिश्रम घेतले.