महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:06+5:302021-03-10T04:31:06+5:30
नंदुरबार : तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आंतर राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना ऑनलाईद्वारे कर्तृत्ववान ...

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नंदुरबार : तालुक्यातील टोकरतलाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आंतर राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींना ऑनलाईद्वारे कर्तृत्ववान महिलानांविषयी मार्गदर्शन केले. प्रारंभी मुख्याध्यापिका शोभा शर्मा प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुनीता भारती, भावना सोनवणे, मीना पाटील, शालिनी पाटील, कल्याणी पाटील, पदमा परदेशी, सुनीता सामुद्रे, ललिता शिंदे यांनी परिश्रम घेतले.
कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात वेबिनार
शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता कक्ष प्रकोष्ट साततर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले होते.
वेबिनारचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्त्रीचे श्रम व समर्पण हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा पाया असून, तिच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांनी सतत प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी गुणवत्ता संवर्धन कक्ष समन्वयक उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्ता संवर्धनात महिलाविकास विषयक विविध कार्यक्रमांच्या योगदानाची माहिती दिली. या वेळी गुर्जर खाद्यसंस्कृती या ग्रंथाच्या लेखिका माधवी मकरंद पाटील यांचे ‘स्त्री-पुरुष समानता व स्त्री सबलीकरण’ आणि प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मांचे ‘संस्कृती संरक्षिका स्त्री’ या विषयावर व्याख्यान झाले.
समारोपात प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी व इतिहासाविषयी माहिती दिली. याप्रसंगी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील व पी. आर. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा चौधरी यांनी केले. प्रास्ताविक वेबिनारच्या संयोजिका प्रा. डॉ. अर्पना जोबनपुत्र तर आभार प्रा. डॉ. एस. एस. पाठक यांनी मानले. वेबिनारची तांत्रिक बाजू प्रा. डॉ. मिलिंद पाटील व प्रा. हितेंद्र जाधव यांनी सांभाळली. वेबिनारसाठी प्रा. जगदीश चव्हाण, प्रा. विजया पाटील, प्रा. राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.
सारंगखेडा
सारंगखेडा येथील पोलीस ठाणे व शहादा तालुका पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवसानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर महिला पोलीस पाटील व महिला पोलीस यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ उपस्थित होते. यावेळी पोलीस पाटील कविता गिरासे, रेखा कुवर, आशा गिरासे, वैशाली पाटील, महिला पो. कॉ. करुणा जाधव, पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सावळदा पोलीस पाटील कविता गिरासे यांनी केले. आभार वैशाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी पोलीस संघटनेचे कर्मचारी व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस पाटील आदींनी परिश्रम घेतले.