महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:34 IST2021-03-09T04:34:04+5:302021-03-09T04:34:04+5:30
तोरखेडा, ता.शहादा येथील सु.भ. कदमबांडे माध्यमिक विद्यालय व पु.र.स. गुजराथी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ...

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
तोरखेडा, ता.शहादा येथील सु.भ. कदमबांडे माध्यमिक विद्यालय व पु.र.स. गुजराथी कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका टी.ए. बडगुजर होत्या. या वेळी प्राचार्या पी.टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्याते प्रा.एस.ए. पाटील, ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी. बोरसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तेजस्विनी सोनार तर आभार चंदना कुमावत या विद्यार्थिनींनी मानले.
महिला महाविद्यालय, नंदुरबार
नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ प्रा. मीना हजारी तर अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एच. झैदी यांनी कार्यक्रम घेण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. यानंतर विद्यार्थिनींच्या वतीने गायत्री भोई व मन्यार नमीरा आसिफ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा.मीना हजारी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन कसा सुरू झाला यावर प्रकाश टाकत महिलांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढायाबाबत माहिती दिली. प्रा.डॉ.राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एम. साळुंके यांनी मानले.
के.डी. गावीत विद्यालय, देवपूर
नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील के.डी. गावीत माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिननिमित्त विद्यार्थिनी पौर्णिमा गावीत व ऋतिका पेंढारकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी महिला शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. मीनाक्षी व्यास यांनी मुलींनी प्रत्येक क्षेत्रात कामाचा ठसा उमटवून आपल्या आईवडिलांचे नाव रोशन करावे, असे आव्हान केले. सुनील पाटील, संजय महाजन, नूतन पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. फलक लेखन उदय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन हेमांगी पाटील तर आभार माधुरी साठे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोहर साळुंके, अतुल गावीत, मनोज सूर्यवंशी, कन्हैयालाल पाटील, राकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
एस.ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना काळातील सर्व नियम पाळत महिला दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी सर्व महिला शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या नूतनवर्षा वळवी होत्या. या वेळी येथील बीएड कॉलेजच्या प्राचार्या नंदा वसावे, उपमुख्याध्यापक व्ही.आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक अरूण गर्गे, सर्व महिला शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये लक्ष वेधून घेताना एस.एस. पाटील यांनी सुंदर एकांकिका सादर केली. यात उर्मिला मोरे, ललिता पानपाटील, सुचिता सुतार, प्रसाद दीक्षित यांनी सुंदर साथ दिली. सर्व महिला शिक्षिकांना भेटवस्तू देण्यात आली. मनीष पाडवीनी सुंदर केक महिलांसाठी बनवून आणला तसेच सालाबादाप्रमाणे 'सुखदा २०१९' हस्तलिखित महिलांकडून संकलित कविता, स्वरचित कथा यांचे प्रकाशन प्राचार्या नूतनवर्ष वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन नीलाक्षी मिश्रा, श्रुती पवार तर आभार पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा यांनी मानले.