गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:25+5:302021-07-24T04:19:25+5:30

नंदुरबार शहरातील राजे शिवाजी विद्यालयात सकाळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षक यांना गुलाबपुष्प देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. या वेळी विद्यार्थांनी ...

Various programs in the district on the occasion of Gurupourni | गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

नंदुरबार शहरातील राजे शिवाजी विद्यालयात सकाळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षक यांना गुलाबपुष्प देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. या वेळी विद्यार्थांनी गुरुंप्रती आपल्या विचारातून कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी जागृती गिरासे हिने गुरुशिष्य महिमा गोष्टीतून प्रकट केल्या. दुरवेश गोसावी, रेणुका मराठे, यांनी आपल्या विचारातून गुरुशिष्य महिमा सादर केले. कार्यक्रमात मुख्याध्यापक रवी पाटील, शिक्षक उपस्थित होते. शा. ज. नटावदकर विद्यमंदिर, नंदुरबार शहरातील शा. नटावदकर प्राथमिक व बालमंदिरात ऑनलाइन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यात नर्सरी, ज्युनिअर व सिनिअरच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. याप्रसंगी नचिकेत रणवीर राजपूत, मितांश चंद्रशेखर धामणे, शनय प्रवीण पाटील, खुशाल प्रकाश बागुल, भार्गवी चंद्रकांत गोरे, हर्षवर्धन सुनील पाटील, कैवल्य चिमण पाटील, मृगांक राहुल जोशी, मंथन राकेश साळुंके, मानव दिनेश भुसनर, भार्गवी नितीन पाटील, दुर्वा पांडुरंग गाडे, मोक्ष अंबालाल वाढणे, जान्हवी नीलेश राजपूत, मानस रोहिदास वाडीले, प्राजक्ता अशोक पवार, प्रांजल रतिलाल निकुंभ, शौर्य तुषार पवार शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पी. के. पाटील विद्यालय, नंदुरबार

नंदुरबार शहरातील पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासऋषीच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांनी गुरुपौर्णिमेविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत गुरू-शिष्य परंपरा विषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक सुरेंद्र पाटील, अनिल चौधरी, विश्वास गायकवाड, सुधाकर सूर्यवंशी, छाया मोरे, उज्ज्वला चौरे, नितीन साळी, अमोल भदाणे, जितेंद्र चौधरी, शेखर पाटील, रवींद्र चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Various programs in the district on the occasion of Gurupourni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.