जिल्ह्यात विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:39+5:302021-03-10T04:31:39+5:30
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित जागतिक महिला दिनी अध्यक्षस्थानी अध्यक्षा ॲड.सीमा वळवी होत्या. याप्रसंगी मुख्य ...

जिल्ह्यात विविध कार्यक्रम
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित जागतिक महिला दिनी अध्यक्षस्थानी अध्यक्षा ॲड.सीमा वळवी होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, मनरेगाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर, रूपाली गावडे आदी उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येवून शपथ घेण्यात आली. याहामोगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात रघुनाथ गावडे, निर्मला राऊत, रूपाली गावडे, भाग्यश्री त्रिकाल यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व क्षेत्रामध्ये महिला जिद्दीने व चिकाटीने काम करत आहेत ते वाखाण्याजोगे आहे. जिल्हा परीषदमधील महिला कर्मचारी घरातील काम सांभाळून ऑफिसचे काम करतात ते आपले मॅनेजमेंट स्कील असून, ही आपल्याला मिळालेली नैसर्गिक देणगीच असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन वंदना उचे तर आभार डाॅ.वर्षा फडोळ यांनी मानले.शहादा
शहादा येथील जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कोविडच्या नियमावलीचे पालन करून घेण्यात आला. प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सरला पाटील होत्या. या कार्यक्रमात परिसरातील आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात बामखेडाचे सरपंच साधना पाटील, उपसरपंच रमण सोनवणे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुमन निकुम, ग्रामपंचायत सदस्या निर्मला निकुम, मीना निकुम, आशा पर्यवेक्षक, बिलाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सरला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वंदना पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.