मोरवड येथे आरती पूजनासह विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:01 IST2018-11-10T21:01:43+5:302018-11-10T21:01:47+5:30

बोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल़े     ...

Various programs with Aarti Poojana at Morvad | मोरवड येथे आरती पूजनासह विविध कार्यक्रम

मोरवड येथे आरती पूजनासह विविध कार्यक्रम

बोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडल़े        आरती पूजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांची विशेष उपस्थिती होती़ 
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ़ हिना गावीत, आमदार विजयकुमार गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पोलीस निरीक्षक संजय पाटील, डॉ़ कांतीलाल टाटीया, शिवसेना जिल्हाध्यक्ष आामशा पाडवी, रुपसिंग पाडवी, हिरामन पाडवी, विलास डामरे, किसन पाडवी, प्रकाश ठाकरे, जर्मनसिंग वळवी,  पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, आदी उपस्थित होत़े
दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यासह विविध गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमे घेण्यात येत आहेत़ यात भाविकांची मोठी उपस्थिती लाभत आह़े मोरवड येथे सध्याकाळी 8 वाजता संत चंद्रसेन महाराजांच्या घरापासून आरती पूजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली़ या वेळी महिलांनी हातात आरती घेत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण वळवी यांनी केल़े आभार पंचायत समितीचे माजी सभापती जितेंद्र पाडवी यांनी मानल़े आरती पूजन कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, सौराष्ट्र, राजस्थान आदी राज्यातून शेकडो भाविक उपस्थित होत़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र पाडवी, प्रविण वळव्ी, नारायण ठाकरे, लक्ष्मण महाराज यांनी परिश्रम घेतल़े 
 

Web Title: Various programs with Aarti Poojana at Morvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.