स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:42+5:302021-08-20T04:34:42+5:30
नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य के. व्ही. ...

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नंदुरबार येथील कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य के. व्ही. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका व्ही. एन. पाटील, उपमुख्याध्यापक एस. एम. पाटील, पर्यवेक्षक डी. पी. राजपूत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक राहुल मोरे, बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या वैशाली शिंदे, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य एस. डी. पाटील, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे प्राचार्य पी. बी. पाटील व सर्व शाखांचे शिक्षक उपस्थित होते. क्रीडाशिक्षक आर. डी. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
के. डी. गावीत विद्यालय, कोठली
नंदुरबार तालुक्यातील कोठली येथील के. डी. गावीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आसाराम नाईक यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रा. स्नेहल साळुंके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्त अभियान प्रतिज्ञा उपशिक्षक प्रवीण चौधरी यांनी शपथ म्हणून घेतली. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाडवी, प्रदीप वळवी, कांतिलाल पाडवी, महेंद्र वळवी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी एम. जी. पाटील, एस. टी. माळी, आर. पी. पाटील, पी. डी. चौधरी, मगन राठोड, एन. जे. पाटील, के. एस. खंडारे, एम. एस. पाडवी, एस. जे. पवार, ए. एस. पाटील, आर. एन. राजपूत, व्ही. सी. मालके, व्ही. बी. जाधव, जे. बी. देवरे, आर. आर. पाटील, ए. बी. पाटील, बी. टी. पवार, एम. डी. पाडवी, एस. एस. गावीत यांनी परिश्रम घेतले. किशोर भावसार यांनी सूत्रसंचालन केले.