१५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:09+5:302021-08-18T04:36:09+5:30

नंदुरबार तालुक्यातील टोकरतळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इंदिरा बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या ...

Various events on 15th August | १५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम

१५ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम

नंदुरबार तालुक्यातील टोकरतळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इंदिरा बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका शोभा शर्मा, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. माध्यमिक विद्यालय, तळवे, ता. तळोदा येथील माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष चेतन पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संचालक महेश मगरे, तुकाराम पाटील, मुख्याध्यापक नीमेश सूर्यवंशी, रमाकांत चौधरी, वसंत मराठे, गजेंद्र गोसावी, साहेबराव पाटील, देविदास मराठे, अनिल इंदिस, अनिल टवळे, आर. जी. माळी, संजय तनपुरे, कल्पेश तनपुरे, अनिल मगरे, चंद्रकांत करणकार, गजानन माळी उपस्थित होते. राम सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

तळोद्यात हवालदार किशोर पाटील यांचा गौरव

तळोदा : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनानिमित्त जम्मू-काश्मीर व सियाचीन भागांत १७ वर्षे कर्तव्य बजावून आलेले मराठा बटालियनमधील हवालदार किशोर पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळ, नंदुरबारमार्फत त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. बर्फाळ प्रदेशातील रक्त गोठविणाऱ्या थंडीत, देशाच्या विविध भागांतील सीमांवर १७ वर्षांत आलेले प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आपल्या साध्या, सरळ भाषणातून व्यक्त करीत, नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना जास्तीत जास्त संख्येने आर्मी, नेव्ही, पॅरामीटर फोर्स व सैन्यभरतीत जाण्याचे आवाहन केले. यावेळी भारतमातेचे वैभव अजरामर ठेवण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुजाता साळवे यांनी प्रास्ताविक, तर कदम यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळाचे अध्यक्ष मिलिंद धोदरे, सचिव सुजाता साळवे, राजविहिर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेचे मुख्यध्यापक वाघंबर कदम, उपशिक्षिका सोनाली पाटील, यश धोदरे, संस्कृती धोदरे, आदींसह झूम मीटिंगच्या माध्यमातून निवडक विद्यार्थी उपस्थित होते.

आश्रमशाळा, जमाना

धडगाव : सातपुडा सर्वोदय मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जमाना, ता. अक्कलकुवा येथील ध्वजवंदन संस्थेचे उपाध्यक्ष बी. बी. पवार यांचा हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव निमेश पवार, पंचायत समितीचे सदस्य भरत पाडवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तापसिंग पाडवी, मुख्याध्यापक भगवान महिरे, मुख्याध्यापिका सुनंदा बोरसे, माजी मुख्याध्यापक अरुण भदाणे, नारसिंग पाडवी, दिलीप पाडवी, चंद्रकांत पाडवी, जयेश पाडवी, ग्रामपंचायत सदस्य, दिलीप जेकमसिंग पाडवी, टेमऱ्या पाडवी, पोलीस पाटील भगतसिंग पाडवी, गोविंदा बागूल, जगदीश रामोळे, जयप्रकाश पाडवी, शकुंतला पाडवी, सूरसिंग पाडवी, उमेश सूर्यवंशी, महेश सावळे, संदीप पवार, तुकाराम वसावे, माधुरी वसावे, गौरव पाडवी, संदीप पाटील, मुकेश बावीस्कर, भाऊराव वाढाई, दिलीप पाडवी, कांतीलाल पाडवी, ईश्वर परमार, सायसिंग वसावे, अभिमन्यू पगार, सुशीला ठोके, सोमी पराडके, गमली वसावे, विमल वसाने, आदी उपस्थित होते. डी. डी. नेरकर यांनी सूत्रसंचालन, तर भार रामोळे यांनी आभार मानले.

ग्रामपंचायत कार्यालय, सारंगखेडा

सारंगखेडा (ता. शहादा) येथे ग्रामपंचायत कार्यालयात ७५व्या भारतीय स्वतंत्रता दिनानिमित्त सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी तंबाखूमुक्त दिनानिमित्त शपथ घेतली. याप्रसंगी उपसरपंच न्हान भील, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब ठाकरे, पंचायत समिती सदस्य रत्‍नाबाई मालचे, मंडळाधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस. एन. डिगराळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, दीपिका ठाकरे, रेखाबाई ठाकरे, मनोज भिल, गुड्डू भिल, आप्पा भिल, भगवान भिल, प्रभाकर कुवर, किरण पाटील, भूषण मोरे, धनराज कोळी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्त दिवसानिमित्त शपथ दिली. संजय मंडळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Various events on 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.