दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:46 IST2020-03-03T12:45:52+5:302020-03-03T12:46:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज ...

Various decisions made in the meeting of Dahigaon Gurav community | दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

दाहीगाव गुरव समाजाच्या बैठकीत विविध निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था नंदुरबार व गुरव समाज उन्नती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तिमाही सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्नती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गुरव होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,समस्त दाहीगाव गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, नंदुरबार गुरव समाज अध्यक्ष प्रविण गुरव माजी अध्यक्ष विश्वासराव भामरे, भीमराव गुरव, नगरसेविका भावना गुरव, मनीषा गुरव, शशिकांत बेगराज, मधुकर गुरव, अशोक गुरव, रवींद्र गुरव, पुंडलिक गुरव, विश्वनाथ गुरव, ह.भ.प.नरेंद्र गुरव, ह.भ.प. वासुदेव महाराज, संजय गुरव, गोरख गुरव, सुरेश गुरव, मोतीलाल गुरव , बद्रीनाथ गुरव , निंबा गुरव, वामन गुरव, अशोक गुरव, नितीन गुरव, दीनानाथ गुरव, छोटू गुरव, नानाभाऊ गुरव, प्रकाश गुरव, राजेंद्र सोनवणे, प्रमोद गुरव, रामदास गुरव, प्रतिमा गुरव, सोनाली गुरव, पुरुषोत्तम गुरव, अरुण गुरव, आदी व्यासपीठावर होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत काशिबा महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव नाना गुरव यांनी केले. या वेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी समाजात काम करताना तन-मन-धनाने करावे आपसातील वैर विसरून समाज एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. शासनाचा योजनांचा लाभ समाजबांधवांना मिळवून द्यावा, गुरव समाज बेल फुल देऊन आपले उदरनिर्वाह करतो गुरव समाजाची शहनाई हे मंगल वाद्य गुरव समाजाचे प्रतीक आहे. मंगल वाद्य ही परंपरा त्यांनी जोपासावी असेही सांगितले.
त्यानंतर गुरव समाजाच्या पुढील तीन वषार्साठी अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातून सुरेश केशव गुरव यांची निवड करण्यात आली. निवडणूक न करता सुरत, नासिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, येथील समाज अध्यक्षांनी तळोदा येथील सुरेश केशव गुरव यांना पाठिंबा दिल्यामुळे सवार्नुमते त्यांना अध्यक्ष करण्यात आले. निवड झाल्यानंतर त्यांनी सांगितले की संस्थेचा अध्यक्ष पदाला मी न्याय देईन, समाजातील घटकांसाठी विविध योजना आणण्याचा मी प्रयत्न करीन, पर राज्यातील समाजातील रोटी-बेटी व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले याप्रसंगी दाहीगाव अध्यक्ष नरेंद्र गुरव यांनी निवडणूक न करता सर्वांच्या संमतीने तीन राज्यातुन अध्यक्षाची निवड झाली. म्हणजे आपली एकता आहे. समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण करून समाजाची प्रगती कशी होईल याचा विचार करावा असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नंदुरबार येथील संत काशिबा महाराज गुरव चौकात मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. याप्रसंगी प्रविण गुरव यांचा वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी समाजाला शितशव पेटी दान केली आहे. जी समाजातील घटकांना वापरण्यासाठी मोफत मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रविण गुरव, सुधीर गुरव, हेमंत गुरव, रघुनाथ गुरव, किरण गुरव, विजय शिरसाट, शशिकांत गुरव, वैभव गुरव, गणेश गुरव, सुधाकर गुरव, भूपेंद्र गुरव, गणेश गुरव, नानाभाऊ गुरव, हरिश्चंद्र गुरव, नगिन गुरव, पुरुषोत्तम गुरव, आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन वाय.आर. गुरव, आभार सचिव शशिकांत गुरव यांनी मानले.

Web Title: Various decisions made in the meeting of Dahigaon Gurav community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.