काणे विद्यालयात मराठी भाषा संवर्धनानिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:07+5:302021-02-06T04:58:07+5:30

या वेळी मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने वक्तृत्व, गीतगायन, निबंध, म्हणी सांगणे व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पाचवी ...

Various competitions for the promotion of Marathi language in Kane Vidyalaya | काणे विद्यालयात मराठी भाषा संवर्धनानिमित्त विविध स्पर्धा

काणे विद्यालयात मराठी भाषा संवर्धनानिमित्त विविध स्पर्धा

या वेळी मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने वक्तृत्व, गीतगायन, निबंध, म्हणी सांगणे व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पाचवी ते सहावीच्या गटात तोंडी म्हणी सांगणे स्पर्धेत प्रथम प्राप्ती भट, द्वितीय सोनल मंगळे, तृतीय श्रद्धा अहिरे, उत्तेजनार्थ जान्हवी कामडे तर सातवी ते आठवीच्या गटात काव्यवाचन स्पर्धेत प्रथम साक्षी जाधव, द्वितीय भूमी पवार, तृतीय दुर्वा चौधरी, उत्तेजनार्थ जान्हवी भोई आली. नववी ते दहावीच्या गटात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सृष्टी परदेशी, द्वितीय जागृती अहिरराव, तृतीय हर्षदा राजपूत, तसेच निबंध स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम दीक्षा चित्ते, द्वितीय दुर्वा चौधरी, तृतीय जान्हवी कामडे, उत्तेजनार्थ सोनल मंगळे तर आठवी ते १० वीच्या गटात प्रथम गायत्री बागुल, द्वितीय जागृती अहिरराव, तृतीय प्राची चौधरी, उत्तेजनार्थ माधवी कापुरे आली.

कथाकथन स्पर्धेत प्रथम आकांक्षा भिलाने, द्वितीय कविता भाबड आली. या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धांचे संयोजन व परीक्षण नंदिनी बोरसे, रेखा गोसावी, शांताराम पाटील, वंदना पाडवी व किसन पावरा यांनी केले. यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक विपुल दिवाण, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Web Title: Various competitions for the promotion of Marathi language in Kane Vidyalaya