शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

मॅरेथॉन स्पर्धा, म्हसावद, ता. शहादा येथे सायरन स्पोर्टस्‌ क्लबतर्फे आयोजित श्री छत्रपती शिवराय रन ऑनलाइन व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये १० ...

मॅरेथॉन स्पर्धा,

म्हसावद, ता. शहादा येथे सायरन स्पोर्टस्‌ क्लबतर्फे आयोजित श्री छत्रपती शिवराय रन ऑनलाइन व्हर्च्युअल मॅरेथॉनमध्ये १० स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून पाच, दहा व एकवीस किलोमीटर धावणे स्पर्धा घेण्यात आली. म्हसावद येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी विवेक महाले, जयेश भोसले, यश धनगर यांनी पाच किलोमीटर, तर सागर पाटील, तारकेश्वर महाले यांनी दहा किलोमीटर स्पर्धेत सहभाग घेतला. सुधाकर पाटील, नितीन महिंद्रे यांनी दहा किलोमीटर, तर दुर्गेश्वर लांडगे यांनी पाच किलोमीटरमध्ये सहभाग घेतला. राहुल पाडवी, सुनील पवार यांनी एकवीस किलोमीटर स्पर्धेत भाग घेतला. यासाठी सुधाकर पाटील, नितीन महिंद्रे यांनी मार्गदर्शन केले.

शिवाजी महाराजांच्या विचारांनी बळ मिळते -खासदार डॉ. हिना गावित

नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी, पत्रकार सूर्यभान राजपूत, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, नगरपालिका प्रतोद नगरसेवक चारुदत्त कळवणकर, माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन जगताप, अशोक राजपूत, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, मराठा समाजाचे अध्यक्ष श्रावण मराठे, प्रल्हाद मराठे, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, महेंद्र मंगा चौधरी, मोहिनीराज राजपूत, हरीश हराळे, रोहिदास पवार, महेंद्र मराठे, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक राजेंद्र पाटील, नगरसेवक संतोष वसईकर, चेतन राजपूत उपस्थित होते. प्रारंभी, खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे तीन वेळा वाचन केले आहे. जेव्हा मी २६ व्या वर्षी खासदारकीची निवडणूक लढविली, त्यावेळी माझ्यासमोर ज्येष्ठ व अनुभवी उमेदवार उभे होते. त्यावेळी माझे विरोधक माझ्यावर हास्य करीत होते; परंतु मी शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन पूर्ण विश्‍वासाने निवडणूक लढली व ती जिंकलीही. मला शिवाजी महाराजांच्या विचारांनी निवडणूक लढण्याचे बळ मिळाले. यावेळी डॉ. रवींद्र चौधरी, गजेंद्र शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गणेश पाटील, तर आभार क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण मराठे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पप्पू मराठे, उपेंद्र राजपूत, दीपक मराठे, भगतसिंग राजपूत, प्रेमचंद राजपूत, चिनू फटकाळ, अक्षय साळी, यशराज मराठे, खुमानसिंग राजपूत, हेमंत राजपूत, संदीप चौधरी, विनोद मराठे, युवराज राजपूत, भीमसिंग वळवी, मुकेश मराठे, छोटू कासार, आश्‍विन सोनार आदींनी परिश्रम घेतले.

कळंबू

कळंबू, ता. शहादा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात माजी प्राचार्य बन्सीलाल बोरसे यांच्या हस्ते व मराठा कुणबी पाटील युवा मंच येथे दत्तात्रय बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच वासुदेव बोरसे, मुख्याध्यापक नवल देवरे, शिक्षक नीलेश शिवदे, शालिग्राम बोरसे, गुलाब बोरसे, देवीदास कुंवर, वेडू भील, वासुदेव बोरसे, दगडू बोरसे, युवराज बोरसे, दत्तू बोरसे, रितेश बोरसे, प्रवीण वाघ, नाना शिंदे, भरत कुंवर, संजय महाले, तेजस बोरसे, राकेश बोरसे, निखिल बोरसे, शरद भदाणे, सूरज पाटील आदीची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपशिक्षक राकेश पाटील यांनी केले.