मराठी दिनानिमित्त विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:14+5:302021-03-01T04:35:14+5:30

नंदुरबार नंदुरबार शहरातील राजे शिवाजी विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या ...

Various competitions on the occasion of Marathi Day | मराठी दिनानिमित्त विविध स्पर्धा

मराठी दिनानिमित्त विविध स्पर्धा

नंदुरबार

नंदुरबार शहरातील राजे शिवाजी विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक आर.जी. पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कला महाविद्यालय, बामखेडा

बामखेडा, ता.शहादा येथील कला महाविद्यालयात मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने ऑनलाइन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.वाय.आर.पाटील होते. प्रारंभी सरस्वती पूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. हर्षदा पुराणिक यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा सविस्तर आढावा घेतला. अध्यक्ष डॉ.वाय.आर. पाटील यांनी मराठी साहित्यावर प्रकाशझोत टाकला. या ऑनलाइन व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी ऑनलाइन पध्दतीने उपस्थित होत्या. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सी.एस. करंके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.ए.एम. गोसावी तर आभार प्रा.वाय.सी. गावीत यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

वनवासी विद्यालय, चिंचपाडा

चिंचपाडा, ता.नवापूर येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रा.आर.डी. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विकास सपकाळे उपस्थित होते. त्यांनी मराठीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या वेळी रितीका नाईक, दीक्षिता वळवी, कविता निकम, नवनीत चिंचोले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमोद चिंचोले, प्रा.आर.डी. सोनवणे नटसम्राट या वि.वा. शिरवाडकरांच्या नाटकातील काही संवाद सांगितले. सूत्रसंचालन किशोरी पाडवी, नीलम प्रजापती तर आभार दिया वळवी हिने मानले. कार्यक्रमास प्रा.डी.एस. गावीत, एस.व्ही. आहेर, योगेश पाटील उपस्थित होते. सकाळसत्रात व्ही.बी. बागुल होते. प्रास्ताविक रेखा पाटील, कृष्णा पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

म्हसावद

शहादा तालुक्यातील म्हसावद येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.पुरुषोतम पटेल होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अंबाजी माता भक्त मंडळाचे चेअरमन अंबालाल दगा लांडगे उपस्थित होते. याप्रसंगी सातपुडा मराठी भाषा साहित्य परिषद स्थापन करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक कला-विज्ञान विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पुरुषोत्तम पटेल यांची निवड करण्यात आली. ते म्हणाले की,सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामीण भागात मराठी साहित्य चळवळ रुजावी, साहित्य लेखनाचे मार्गदर्शन करणे, वाचन, लेखन, चळवळ रुजविणे हे साहित्य परिषदेची उद्दिष्टे असतील, अशी माहिती त्यांनी दिली. उपाध्यक्ष वसंत शिवाजी कुलकर्णी, सचिव अशोक बागले, कोषाध्यक्ष भरत काकुस्ते, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण जगदाळे, संघटक राजेंद्र निकम, सदस्यपदी बी.आर. कोकणी यांची निवड करण्यात आली. प्रा.पुरुषोत्तम पटेल यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक लक्ष्मण जगदाळे यांनी केले. या वेळी प्रा.पुरुषोत्तम पटेल, राजेंद्र निकम आणि शुभम जगदाळे यांनी कविता सादर केली. बालसाहित्यिक आदित्य बागले याने चिऊ-काऊची सुंदर गोष्ट सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. याप्रसंगी दीपराज धनगर, पंकज लांडगे, प्रसाद लांडगे, दुर्गेश ठाकरे, शुभम जगदाळे, विजय आडगाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक बागले यांनी केले.

Web Title: Various competitions on the occasion of Marathi Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.