न्युट्रिशन इंडिया कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:52+5:302021-02-17T04:37:52+5:30
समाजामध्ये आरोग्य आणि पोषण विषयावर समाजामध्ये जागरूकता यावी तसेच या पथदर्शी कार्यक्रमाचे मागील दोन वर्षाचे यश साजरे करण्यासाठी दिल्ली ...

न्युट्रिशन इंडिया कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम
समाजामध्ये आरोग्य आणि पोषण विषयावर समाजामध्ये जागरूकता यावी तसेच या पथदर्शी कार्यक्रमाचे मागील दोन वर्षाचे यश साजरे करण्यासाठी दिल्ली येथून ७ महिला दुचाकीवरून सदर विषयांवर जनजागृती करत येत आहेत. ही जनजागरण कार्यक्रम रॅली दिल्ली ते आग्रा, ग्वालीयर, इंदूरहून नंदुरबार पोहोचली आहे. सदर कार्यक्रम १७ रोजी नंदुरबार येथे आयोजित केला आहे. पालकमंत्री, खासदार यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, रेकिट्ट बेनकायजरचे मुख्य अधिकारी रवी भटनागर, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लान इंडियाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. सोबतच इतर शासकीय अधिकाऱ्यांही या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. या कार्यक्रमात कुपोषणमुक्त झालेल्या बालकांच्या माता आणि गावपातळीवरील कार्यकर्ते आपले मनोगत मांडणार आहेत. कार्यक्रमाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते बस स्टॅन्डपर्यंत जन-जागृती रॅलीने होईल.