जिल्हाभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:40+5:302021-08-18T04:36:40+5:30

ब्राह्मणपुरी, ता.शहादा येथील सरीबेन इंदास पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण ...

Various activities on the occasion of Independence Day in the district | जिल्हाभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम

जिल्हाभरात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम

ब्राह्मणपुरी, ता.शहादा येथील सरीबेन इंदास पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून हितेश सोनार उपस्थित होते. यानंतर होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षण क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यासाठी वर्धमान सहकारी पतसंस्था, शहादा, इंदास पाटील बागायतदार संघ ब्राम्हणपुरी, अष्टविनायक कृषी सेवा केंद्र खेड दिगर, जितेंद्र उध्दव पाटील, उपसरपंच संगीता दिगंबर पाटील, विनोद सोनार, जय योगेश्वर फ्रूट सप्लायर्स, रमाकांत नथ्थू पाटील, कपिल पाटील, श्रीकृष्ण शिक्षक पतसंस्था, नामदेव कटारे, नरसई पाटील, धनसिंग राजपूत आदी दात्यांनी देणगी दिली. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस.बी. पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

कळंबू येथे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन

कळंबू, ता. शहादा येथे कोविड नियमांचे पालन करत स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत येथे माजी सैनिक संभाजी बोरसे व जिल्हा परिषद मराठी शाळेत माजी सैनिक जयवंत पाटील व तलाठी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी सरपंच सुवर्णाबाई बोरसे, उपसरपंच वासुदेव बोरसे, ग्रामविस्तार अधिकारी एम.बी. चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य हिम्मतराव बोरसे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नवल देवरे, ग्रामपंचायतींचे सदस्य,

जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग, विविध संस्थांचे, समितींचे पदाधिकारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

जिजामाता महाविद्यालय, नंदुरबार

नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देवरे, क्रीडा संचालक डॉ. धामणे, तसेच सर्व शिक्षक व निवृत्त संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी ज्युनियर विभागाचे प्रा.के.जी. सोनार यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, शहादा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व कामगार कल्याण केंद्र शहादा येथे महावितरण कंपनीत कार्यरत गुलाबराव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन कामगार कल्याण केंद्र शहादाचे सहाय्यक केंद्र संचालक अभिजित पेंढारकर, रवींद्र गुमाने, रूपाली थोरात यांनी केले होते. याप्रसंगी महावितरण कंपनीतील तांत्रिक कामगार शांतीलाल वसईकर, संजय चौधरी, दिनेश बागुल, रामकृष्ण शेवाळे, नामदेवराव पाटील, गौरव व्यास, रोहित भावसार, प्रवीण बोरसे, सुशील निकम, पवन कापते , मोहन गवळेसह राज्य परिवाहन मंडाळातील संदीप पाटील व कामगारांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात गुलाबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. अभिजित पेंढारकर यांनी कामगार कल्याण मंडळाच्या सोयीसवलतींबद्दल माहिती दिली.

जयकिसान विद्यालय, असलोद

असलोद, ता. शहादा येथील जय किसान विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेच्या अध्यक्षा ललिताबाई पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष रोहिदास मराठे, सचिव बाळासाहेब पवार, संचालक मंडळातील सदस्य भीमसिंग गिरासे, पीतांबर पवार, चंद्रकांत पाटील, वेडू पाटील, राधेशाम तांबे, दिनेश जैन, दिलीप पवार, दिनेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते . मुख्याध्यापक डी.एम. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एस.वाय. साळुंखे यांनी केले. शासनाच्या परिपत्रकानुसार कोविड नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांसाठी वकृत्व, निबंध, गीतगायन, वेशभूषा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन आपापली कला दाखवून उपस्थितांचे मन जिंकून घेतले. सूत्रसंचालन डी.जे. गिरासे तर आभार एस.डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

अक्कलकुवा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण

अक्कलकुवा येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तालुका विधी सेवा प्राधिकरण व कृषी विभाग अक्कलकुवा तसेच वनविभागमार्फत अक्कलकुवा न्यायालयाच्या आवारात दिवाणी न्यायाधीश व्ही.पी. शिंदे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी न्यायालयाच्या आवारात वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार अक्कलकुवा वकील संघानी घेतला आहे. या उपक्रमात वकिलांनी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास अक्कलकुवा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.एन.एस. शेख, ॲड.आर.आर. मराठे, ॲड.एस.व्ही. वाणी, ॲड.आर.टी. वसावे, ॲड.एम.आय. मन्सुरी, ॲड.एस.ए. पाडवी, ॲड.पी.आर. ठाकरे, ॲड.आय.ए. पिंजारी, ॲड.रूपसिंग टी. वसावे, ॲड.जी.आर. वसावे, ॲड.जे.टी. तडवी, ॲड.ए.एम. वसावे, ॲड.डी.एफ. पाडवी, ॲड.गौरी पाटील, ॲड. यशो एस. वसावे, ॲड. पी. व्ही. ठोंबरे, अक्कलकुवा गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी, मंडळ कृषी अधिकारी शिंदे, वनविभागाचे वनपाल सांगळे, जे.पी. सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अक्कलकुवा न्यायालयाचे सहा. अधीक्षक विनायक एस. पाडवी, लघुलेखक डी.एस. धनगर, जे.टी. वळवी, एस.के अहिरे, कैलास शिवदे, एस.टी. पाटील, पी.व्ही. भालेराव, एस.एस. जावरे, एम.एम. ठाकूर व सी.ए. ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

ब्राह्मणपुरी

ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील वनिता शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीबाई माध्यमिक विद्यालय, एम.के. पाटील प्राथमिक विद्यामंदिर ब्राम्हणपुरी व एम.के. पाटील इंग्लिश मिडियम स्कूल ब्राम्हणपुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मदन पाटील यांचा शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओंकार फकिरा पाटील, डॉ. माधवराव पाटील, नरसई सखाराम पाटील, केंद्रप्रमुख शामराव ईशी तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत प्रकाश पाटील, रेखा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.यू. पटेल, प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक ए.ओ. पाटील व इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना सननसे उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शारीरिक अंतर ठेवून व सर्वांनी मास्कचा वापर करून कार्यक्रम साजरा केला. सूत्रसंचालन एल.बी. सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Various activities on the occasion of Independence Day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.