स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:01+5:302021-08-17T04:36:01+5:30
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात दगा आत्माराम पाटील, तर मागासवर्गीय कन्या छात्रालयात ग्रा.पं. सदस्या इंदूबाई ...

स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात दगा आत्माराम पाटील, तर मागासवर्गीय कन्या छात्रालयात ग्रा.पं. सदस्या इंदूबाई वल्लभ पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सरपंच जागृती पाटील, काकर्दे येथील सरपंच, उपसरपंच, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष भालेर, नगाव, तिसी, काकर्दे, वडवद येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाकाळात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विजय बोरसे, डॉ. राकेश पाटील, दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या विद्या चव्हाण, पर्यवेक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. तंबाखूमुक्तीच्या शपथेचे वाचन अनिल कुवर यांनी केले.
पी. जी. फार्मसी महाविद्यालय, चौपाळे
नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील पी. जी. फार्मसी महाविद्यालयात सदानंद रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष रुद्रप्रताप रघुवंशी, संचालक सिद्धार्थ रघुवंशी, देवेंद्र रघुवंशी, प्राचार्य डॉ. राजेश अहिरराव उपस्थित होते. कार्यक्रमास हिरालाल पटेल, वामन माळी, मकरंद पटेल, अनिल चौधरी, साहेबराव महाजन, सुरेश माळी, गजू राठोड, दशरथ चौधरी, प्रल्हाद चौधरी, रवींद्र बेलदार, पी.जी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य आनंद रघुवंशी, खंडू सरोदे उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा पटेल यांनी केले.
ग्रामपंचायत, गंगापूर
अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेविका वैशाली गिरासे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
जि. प. शाळा, ओरखासपाडा
अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या ओरखासपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संजय घडमडे, उपमुख्यध्यापक सायसिंग पाडवी, एकल अभियान अंतर्गत आचार्य रेहमा वळवी, विद्यार्थी, पालक व जल परिषद मित्र, ऑरगॅनिक शेती मित्र परिवाराचे सुनील वळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
जयनगर
शहादा तालुक्यातील जयनगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. जि.प. मराठी शाळेत शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष कैलास पारधी, श्री चक्रधर माध्यमिक विद्यालयात बन्सी देवीदास पाटील तर ग्रामपंचायतीत सरपंच मीनाबाई सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव विनोद संतोष माळी, ग्रा.पं. सदस्या मनीषाबाई शिंपी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजे शिवाजी विद्यालय, नंदुरबार
नंदुरबार शहरातील राजे शिवाजी विद्यालय, विद्यासागर पब्लिक स्कूल, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा विद्या युवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक रवी पाटील, विद्यासागर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल पायल मंदाना, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आदर्श विद्यालय, लंगडी भवानी
शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील आदर्श विद्यालयात बाबुलाल डेमा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. यावेळी स्थानिक समितीचे चेअरमन रामदास डेमा चव्हाण, सरपंच शशिकला सुरेश पावरा, उपसरपंच निशाबाई रोहिदास पावरा, पोलीस पाटील अमरसिंग बाबुलाल पावरा, ग्रामसेवक, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ वसंत नरशा पावरा, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.
खापर
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे विविध ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले. सार्वजनिक झेंडा चौकात सरपंच करुणाबाई वसावे, जि. प. शाळेत ग्रा. पं. सदस्या अंजना पाडवी, याहामोगी महाविद्यालयात प्राचार्य अजबसिंग पाडवी, प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रा.पं. सदस्या दक्षाबाई वसावे, कन्या शाळेत ग्रा.पं. सदस्या विद्याबाई कापुरे, ईश्वरकोराई जि. प. शाळेत ग्रा. पं. सदस्य देवीदास वसावे, गतिमंद विद्यालयात ग्रा. पं. सदस्य रोशनबी पिंजारी, वनविभागात विभागप्रमुखांच्या हस्ते, पोलीस दूरक्षेत्रात हवालदार मोहन शिरसाठ, कस्तुरबा गांधी विद्यालयात ग्रा. पं. सदस्य आशाबाई पाडवी तर ग्रा.पं. कार्यालयात उपसरपंच विनोद कामे, महात्मा गांधी विद्यालयात संचालक जगदीश चौधरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच करुणा वसावे, उपसरपंच विनोद कामे, माजी सरपंच जोलू वळवी, माजी उपसरपंच ललीत जाट, डॉ.संजय चौधरी, मुख्याध्यापक लक्ष्मण चौधरी, दगडू चौधरी, राजेंद्र कामे, ग्रामविकास अधिकारी विनोद ढोढरे, सुनील सूर्यवंशी, नरेंद्र चौधरी, कांतीलाल प्रजापती, रोहिदास लोहार उपस्थित होते.
बोरद
तळोदा तालुक्यातील बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये गुलाबसिंग दौलतसिंग गिरासे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय काशीनाथ पाटील, नरहर ठाकरे, सरपंच वासंतीबाई नरहर ठाकरे, पं.स. सदस्य विजय राणा, मंगलसिंग चव्हाण, ग्रा.पं. सदस्या इंदिराबाई चव्हाण, दयानंद चव्हाण, गौतम ढोडरे, मुख्याध्यापक एन.जे. सूर्यवंशी, पर्यवेक्षक बी. ए. पवार, पी. पी. पाटील, व्ही. एफ. कोकणी, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेत तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी एन. बी. गोसावी, डी. एच. राजपूत, हेमकांत राठोड, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शेठ के.डी. हायस्कूल, तळोदा
तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूलच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक भरत बबनराव माळी, अरविंद मगरे, मुरलीधर सागर, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक शिवलाल वळवी, सुनील रमेश सूर्यवंशी, नगरसेवक संजय माळी, अरुण मगरे, राजकपूर सूर्यवंशी, मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी, नागरिक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
तळोदा महाविद्यालय
तळोदा येथील कला व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष भरत बबनराव माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाडवी, उपाध्यक्ष प्रा. सुधीरकुमार माळी, सचिव तथा प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डी. एम. माळी, नगरसेवक संजय माळी, अरविंद मगरे, निवृत्त पोलीस अधीक्षक शिवलाल वळवी, अरुण मगरे, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या गटाने मानवंदना दिली.
वि. का. सोसायटी, तळोदा
तळोदा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीवर चेअरमन संजय बबनराव माळी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरत बबनराव माळी, उपाध्यक्ष प्रा. सुधीरकुमार माळी, संस्थेचे संचालक गजानन मगरे, भगवान कर्णकार, अरविंद रामदास मगरे, गिरधर सागर, हिरकणी भोई, भगवान गोविंद माळी, अरुण मगरे, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक शिवलाल वळवी, मित्तल टवाळे, सचिव दगुलाल माळी आदींसह संस्थेचे सभासद व नागरिक उपस्थित होते.
चावरा स्कूल, शहादा
शहादा येथील चावरा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्राचार्य फादर जॉय यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन त्रिष्णा पाटील व सपना भावसार यांनी केले. आभार माधुरी मांडगे यांनी मानले. उपप्राचार्य फादर विजो, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.