काणे गर्ल्स विद्यालयात विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:42+5:302021-08-22T04:33:42+5:30
या कार्यक्रमात तंबाखूविरोधी शपथ घेण्यात आली. मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने विविध ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा ...

काणे गर्ल्स विद्यालयात विविध उपक्रम
या कार्यक्रमात तंबाखूविरोधी शपथ घेण्यात आली. मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने विविध ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पाचवी व सहावीच्या गटात देशभक्तीपर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम भूमिका पाटील, द्वितीय विभागून जान्हवी पवार, इशिका पाटील, तृतीय विभागून पूर्णा माहेश्वरी व गौरी परदेशी तर उत्तेजनार्थ मनस्वी नाईक व हेतल जाधव, सातवी व आठवीच्या गटात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम दिशा पाटील, द्वितीय विभागून स्वरा साळी व प्राप्ती भट, तृतीय राधिका सोनार, उत्तेजनार्थ विभागून लक्ष्मी पाटील व नियती पाटील, नववी व दहावीच्या गटात देशभक्तिपर गीतगायन स्पर्धेत प्रथम साक्षी जाधव, द्वितीय योगिता कुंभार, तृतीय खुशी बोरसे, उत्तेजनार्थ दिव्या धनगर व सर्व यशस्वी विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून लायन्स व लायनेस फेमिना क्लबतर्फे प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक विपुल दिवाण होते. या स्पर्धांसाठी नंदिनी बोरसे, योगीता साळी व सीमा गावित यांनी परीक्षण केले. महेश भट व रेखा गोसावी यांनी सूत्रसंचालन केले; तर स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.