जल दिनानिमित्त सप्ताहात विविध उपक्रम, आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:22+5:302021-03-22T04:27:22+5:30
या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन शुभारंभ करणे, २३ मार्च रोजी ग्रामपंचायत ...

जल दिनानिमित्त सप्ताहात विविध उपक्रम, आजपासून सुरुवात
या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन शुभारंभ करणे, २३ मार्च रोजी ग्रामपंचायत , शाळा , अगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजिटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे, २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दूषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे, २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल व २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे , शून्य गळती मोहिम , नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजनेबाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार दक्षता घ्यावी असे आवाहन पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी केले आहे.