वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात ओरोगामी सायन्स क्लबची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:29+5:302021-09-05T04:34:29+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य बी. एम. निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात एस. व्ही. आहेर यांनी ओरोगामी सायन्स क्लब स्थापनेमागचा ...

Vanvasi Vidyalaya and S. C. Establishment of Orogami Science Club at Chavan Junior College | वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात ओरोगामी सायन्स क्लबची स्थापना

वनवासी विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात ओरोगामी सायन्स क्लबची स्थापना

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य बी. एम. निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात एस. व्ही. आहेर यांनी ओरोगामी सायन्स क्लब स्थापनेमागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला. शिक्षक पी. जी. देसले यांनी ओरोगामी सायन्स क्लबमध्ये गणपतीची प्रतिकृती कशी तयार करावी, श्री गणेशाच्या प्रतिकृतीला कशा पद्धतीने आकर्षक डिझाईन करून सजवावे याबद्दल प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रंगीत कागदापासून स्वनिर्मित श्रीगणेशाची प्रतिकृती तयार करण्याचा आनंद मिळवला. यात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणपतीच्या प्रतिकृती तयार केल्या.

याप्रसंगी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चारिता पाटील, शिक्षक एम. जे. देवरे, पी. जी. देसले, आर. आर. पाटील, अपर्णा शिवदे, एन. डी. मराठे, आर. आर. गावीत, शिक्षक व कर्मचारी तसेच सायन्स क्लबचे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

सूत्रसंचालन ए. एस. पाडवी यांनी केले. आभार एम. जे. देवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Vanvasi Vidyalaya and S. C. Establishment of Orogami Science Club at Chavan Junior College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.