वडफळी ग्रामपंचायतीतील पाडे अद्यापही अंधारातच
By Admin | Updated: February 23, 2017 00:42 IST2017-02-23T00:42:20+5:302017-02-23T00:42:20+5:30
वडफळी व कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव-पाड्यांवर अद्यापही वीज पोहोचली नसल्याने हे गाव-पाडे अद्यापही अंधारात आहेत,

वडफळी ग्रामपंचायतीतील पाडे अद्यापही अंधारातच
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी व कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव-पाड्यांवर अद्यापही वीज पोहोचली नसल्याने हे गाव-पाडे अद्यापही अंधारात आहेत, अशी तक्रार पंचायत समिती सदस्या राधाबाई सांगल्या वसावे, माजी सरपंच सांगल्या बाज्या वसावे यांनी केली आहे.
तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायतअंतर्गत पांढरामाती, पाटीलपाडा, देवपाडा, कालीबेलपाडा, जांभापाणीपाडा, बोगदा, कोडवी डेंबापाडा, पोपटी बारपाडा, वडफळीचा तडवीपाडा, माथापाडीपाडा, चापडी, उखलापाडा, केवडी, गामाईपाडा, पाताईपाडा, आरेढी, मोकस, केलीपाडा, मांडवापाडा, नालीपाडा, कुकडापाडा, धोडमालपाडा, तर कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत बारीपाडा या गाव-पाड्यांवर अद्यापपर्यंत वीज पोहोचली नसल्याने हे गाव व पाडे अंधारात आहेत.
या गाव-पाड्यांवर वीज कधी पोहोचेल व त्यांची अंधारातून कधी सुटका होईल, अशी अपेक्षा वडफळी व कुकडीपादर ग्रामपंचायतअंतर्गत येणाºया गाव- पाड्यांवरील रहिवासी व्यक्त करीत आहेत.
या पाड्यांवर लवकरात लवकर वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे यांनी केली आहे.
(वार्ताहर)