डोज तेवढेच कर्मचारी येत असल्याने लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:17+5:302021-01-21T04:29:17+5:30
नंदूरबार : कोरोनाचा मुकाबल करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. यात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी वाढत ...

डोज तेवढेच कर्मचारी येत असल्याने लस
नंदूरबार : कोरोनाचा मुकाबल करून आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. यात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी वाढत असल्याने डोज वाया जाण्याची भीती आहे. परंतु येणारे कर्मचारी तेवढ्याच व्हायल अर्थात कुप्या फोडल्या जात असल्याने डोज वाया जाण्याची टक्केवारी जिल्ह्यात नगण्य आहे.
जिल्ह्यात दर दिवशी किमान ४०० जणांना लस देण्याचे आरोग्य विभागाने निर्धारित केले होते. यासाठी एकूण १२ हजार लाभार्थींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. नोंदणी झालेल्या या लाभार्थींना निरोप दिल्यानंतरही सध्या ते येत नसल्याचे चित्र आहे. यातून पहिल्या दिवशी ६५ टक्के तर दुसऱ्या दिवशी ७५ टक्के लसीकरण जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे.
लसीच्या एका बाटलीत दहा जणांना डोज देता येताे, ही बाटली काढल्यानंतर चार तासात ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोज भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोज वेस्टेज जातात.
लसीच्या एका बाटलीत दहा जणांना डोज देता येताे, ही बाटली काढल्यानंतर चार तासात ती वापरणे आवश्यक असते.